शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

पवित्र पोर्टल मागे घ्या, अधिकार कायम ठेवा; शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 16:12 IST

Gadchiroli : संस्था संचालकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीचा निर्णय मागे घेऊन शिक्षण संस्था संचालकांचे अधिकार कायम ठेवावे, अशी मागणी करीत विविध समस्या मार्गी लावाव्या अशी मागणी जिल्हा शिक्षण संस्था संचालक संघाने केली. ६ ऑगस्ट रोजी राज्याचे मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्र्यांना शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठवून शासनाचे लक्ष वेधले. 

गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयात शिक्षण संस्था संचालकांची सभा मंगळवारी पार पडली. या सभेत विविध शैक्षणिक समस्यांवर चर्चा करण्यात आली. समस्येवर चर्चा करून शासनाला निवेदन पाठविण्यात आले. शिक्षण संस्था संचालकांना शाळा चालविताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर शासनाकडून कोणत्याही प्रकारची सकारात्मक पावले उचलली जात नसल्याने संस्था संचालकांमध्ये नाराजी आहे. बैठकीत विविध समस्यांवर चर्चा करून त्या समस्यांचा पाढा शिक्षणाधिकाऱ्यांसमोर वाचण्यात आला. त्यानंतर मागण्यांचे निवेदने शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठविले. यावेळी संस्था संचालक संघाचे अध्यक्ष अनिल म्हशाखेत्री, सचिव जयंत येलमुले, राजेंद्र लांजेकर, टी. के. बोरकर, आर. डब्ल्यू, वनमाळी, योगराज कुथे, नारायण धकाते, सुनील पारेड्डीवार, रवींद्र मुप्पावार, गंगाधर कुनघाडकर, जयंत हटवार, महेश मुंडले, कविता पोरेड्डीवार, संगीता निखारे, विलास बल्लमवार, देवेंद्र नाकाडे, ना. दो. फाये, यू, बी. पारधी उपस्थित होते.

या मागण्यांकडेही वेधले लक्षन्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे १२ टक्के वेतनेत्तर अनुदान शाळांना लागू करावा, ग्रामीण व शहरी शाळांना वीज बिलात सवलत देण्यात यावी, इमारतीवरील कर माफ करावे, जिल्ह्यातील पेसा अंतर्गत व पेसा बाहेरील शाळांना शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यास परवानगी द्यावी, १५ मार्च २०२४ च्या संच मान्यतेच्या निष्कर्षाचा शासन निर्णय रद्द करावा, अंशतः अनुदानित शाळांनाही वेतनेतर अनुदान लागू करावे. शिक्षण संस्था संचालकांच्या अनेक मागण्या शासनस्तरावर प्रलंबित आहेत. त्या मागण्या मार्गी लावाव्या. 

टॅग्स :GovernmentसरकारGadchiroliगडचिरोली