शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

गडचिरोलीतही प्रतिबंधित क्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2020 5:00 AM

मुंबईवरून आलेल्या सदर कुटुंबातील पुरूषाला आधीच संस्थात्मक विलगिकरणात ठेवले होते. पण त्यांची पत्नी गरोदर असल्यामुळे त्यांना गृह विलगिकरणात ठेवले होते. संस्थात्मक विलगिकरणातील व्यक्तीचा अहवाल दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आल्यानंतर सदर कुटुंबातील सर्वच व्यक्तींच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात शनिवारी गृह विलगिकरणातील महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह येताच त्या कुटुंबातील सदस्यांना संस्थात्मक विलगिकरण करण्यात आले.

ठळक मुद्देअ‍ॅक्टिव्ह रुग्णांत एकाची भर । गृह विलगीकरणातील रुग्ण प्रथमच पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली शहरातील जुनी वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गांधी वॉर्डमध्ये गृह विलगिकरणातील एक महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला. इतक्या दिवसात प्रथमच गृह विलगिकरणातील व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून शहराचा काही भाग प्रतिबंधित करण्याचीही पहिलीच वेळ आहे.मुंबईवरून आलेल्या सदर कुटुंबातील पुरूषाला आधीच संस्थात्मक विलगिकरणात ठेवले होते. पण त्यांची पत्नी गरोदर असल्यामुळे त्यांना गृह विलगिकरणात ठेवले होते. संस्थात्मक विलगिकरणातील व्यक्तीचा अहवाल दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आल्यानंतर सदर कुटुंबातील सर्वच व्यक्तींच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात शनिवारी गृह विलगिकरणातील महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह येताच त्या कुटुंबातील सदस्यांना संस्थात्मक विलगिकरण करण्यात आले.सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास नगर परिषदेच्या वाहनाने गांधी वार्डमधील परिसर सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करून तो परिसर निर्जंतूक करण्यात आला. त्यानंतर तो परिसर प्रतिबंधित करण्यात आला. यावेळी तहसीलदार महेंद्र गणवीर, ठाणेदार प्रदीप चौगावकर, न.प.मुख्याधिकारी संजीव ओहोळ, पं.स.च्या गटविकास अधिकारी सुनिता मरसकोल्हे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनील मडावी आदी अधिकारीगण हजर होते.मुख्य बाजारपेठेलगत हा परिसर असल्यामुळे व्यापारी वर्गातही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.मुख्य बाजारपेठेत खबरदारीची आवश्यकतागांधी वार्डाती रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याने मुख्य बाजारपेठेत थोडे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच परिसरात गांधी चौक असून येथे लोकांची नेहमी वर्दळ असते. या परिसरात शेकडो दुचाकी वाहनांचे आवागमन दिवसभर होत असते. सदर वार्डासह शहरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन, नगर पालिकेची यंत्रणा, आरोग्य विभाग तसेच पोलीस विभागाने कठोर उपाययोजना करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या