शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याची येथे करा तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 15:51 IST

Gadchiroli : पगार लाखात अन् लाच हजारात

गडचिरोली : जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांना लाचखोरीने ग्रासले आहे. काही अधिकाऱ्यांचा पगार पाच आकड्यांत आहे; पण चार आकड्यांतील लाच घेणेही त्यांनी सोडले नाही. यामुळे प्रशासकीय कामे करून घेताना सामान्यांची कशी लूट होते, हे समोर आले आहे. लाचखोरीचे हे ग्रहण कधी संपणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

लाचखोरीत महसूल एक नंबरजिल्ह्यात लाचखोरीमध्ये महसूल सर्वात पुढे आहे. थेट जनतेशी संपर्क येत असलेल्या या विभागातील लाचखोरी रोखण्यात या विभागाच्या प्रमुखांना यश आलेले नाही.

लाचखोरीत कोणत्या विभागाचे किती?महसूल - २महावितरण - १वन - १

सर्वाधिक कारवाया जानेवारीमध्येजिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सर्वाधिक दोन कारवाया जानेवारी महिन्यात झाल्या, फेब्रुवारीत एक कारवाई झाली. मार्च, एप्रिलमध्येही कारवाया झाल्या नाहीत. मे महिन्यात लाचखोरीचा एक गुन्हा नोंद असून, जून महिन्यातही कारवाई झाली नाही.

येथे करा तक्रारलाचखोरांविरुद्ध तक्रार करण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक समोर येत नसल्याचे दिसून येत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अधिकाधिक जनजागृती गरजेची आहे. कोणी लाच मागत असल्यास २०६४ या टोल फ्री क्रमांकासह ९९३०९९१७१७०० या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केले आहे.

चार जणांना अटकलाचखोरीचे सहा महिन्यांत चार गुन्हे नोंद झाले. त्यात चौघांना अटक करण्यात आली. चार प्रकरणांत सर्वात कमी लाचेची रक्कम ५०० रुपये असून, सर्वाधिक रक्कम पाच लाख रुपये इतकी आहे.

गतवर्षीपेक्षा एक कारवाई कमीजिल्ह्यात गतवर्षी जानेवारी ते जून अखेरपर्यंत पाच कारवाया झाल्या होत्या. यावर्षी चारच कारवाया झाल्या आहेत, यंदा नागपूर परिक्षेत्रात वर्धा जिल्ह्यानंतर सर्वांत कमी कारवाया गडचिरोलीत झाल्या आहेत. चंद्रपूर जिल्हा कारवायांत अव्वलस्थानी असून गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट कारवाया केल्याची नोंद एसीबीकडे आहे. 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणCorruptionभ्रष्टाचारCrime Newsगुन्हेगारीGadchiroliगडचिरोली