शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
2
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
3
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
4
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
5
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
6
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
7
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
8
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
9
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
10
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
11
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
13
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
14
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
15
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
16
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
17
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
18
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
19
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
20
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शीतील अतिक्रमण हटविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्षच

By admin | Updated: June 25, 2016 01:25 IST

आष्टी रोडवरील दिना नदीचे मेन कॅनलला लागून असलेल्या २० एकर शासकीय जागेवर अतिक्रमण करून तेथे घर बांधले जात आहे.

तहसीलदार व एसडीओ जबाबदार : माणिकराव तुरे यांचा आरोपगडचिरोली : आष्टी रोडवरील दिना नदीचे मेन कॅनलला लागून असलेल्या २० एकर शासकीय जागेवर अतिक्रमण करून तेथे घर बांधले जात आहे. २०१५ पासून अतिक्रमण होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु या अतिक्रमणाकडे चामोर्शीचे तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रिपाइं खोब्रागडे गटाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष माणिकराव तुरे यांनी केला आहे.यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर जागा ही चामोर्शी शहरातील अतिशय महत्त्वाची व संवेदनशील जागा आहे. येथे अतिक्रमण होत असताना स्थानिक महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होण्याचे कारण काय, असा सवाल तुरे यांनी केला आहे. आमदार डॉ. देवराव होळी यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेतली व क्रीडांगण, बसस्थानकासाठी चामोर्शीवासीयांना जागा उपलब्ध करून द्यावे, असे सांगितले होते. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी चामोर्शी शहरात होत असलेल्या अतिक्रमणाला उपविभागीय अधिकारी हे जबाबदार आहेत, असा सूर लावला. अतिक्रमणधारकातील एकाने न्यायालयात धाव घेऊन ही जमीन आपल्याला द्यावी, अशी मागणी केली होती. परंतु शासनाने अटी व शर्तीमध्ये ते बसत नाही म्हणून त्यांचा अर्ज खारीज केला. सदर अतिक्रमणधारक हा कोट्यधीश असून यापूर्वीही त्याला शासनाने जमीन देण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा अर्ज फेटाळून लावला व त्याने अतिक्रमण केलेली जागा चामोर्शीच्या विकासासाठी मोकळी करून देण्यात यावी, असे आदेश तहसीलदार चामोर्शी यांना देण्यात आले. २२ जून रोजी चामोर्शी येथे महसूल विभागाने समाधान शिबिर घेतले. त्यावेळी आपण या जागेबाबत प्रश्न उपस्थित केला व कोर्टाने आदेश दिलेले असल्याने चामोर्शीच्या तहसीलदारांनी व उपविभागीय अधिकाऱ्यांनी या जागेवरील अतिक्रमण विनाविलंब हटवावे, अशी मागणी केली. असे तुरे यांनी म्हटले आहे. मात्र अजूनही तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांनी या धनाड्याचे अतिक्रमण हटविलेले नाही, असे आरोप तुरे यांनी केला आहे.