शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

५ वर्षात दहा महिने नियमित मुख्याधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:01 IST

एटापल्ली नगर पंचायतमध्ये वारंवार मुख्याधिकारी बदलले जात असल्याने विकास कामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे न.पं.ला स्थायी मुख्याधिकारी द्यावे. या पदावर नायब तहसीलदारांची नियुक्ती करावी. त्याजागी आयएएस अधिकारी नको, असे नगरसेवक रमेश टिकले यांनी म्हटले आहे. नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आयएएस अधिकाऱ्यांच्या जागी नायब तहसीलदारांची नियुक्ती मुख्याधिकारीपदी करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देएटापल्ली नगर पंचायत । विकासात्मक कामांवर होतोय परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : एटापल्ली ग्रामपंचायतीला ३ एप्रिल २०१५ रोजी नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. नगरपंचायतची स्थापना होऊन पाचवर्ष पूर्ण झाली. या पाच वर्षाच्या कालावधीत दोन मुख्याधिकारी नियमित फक्त दहा महिन्यांच्या कालावधीकरिता मिळाले. मात्र पाच वर्षात प्रभारी मुख्याधिकाऱ्यांच्या भरवशावरच चार वर्षाच्या कार्यकाळ होता. प्रभारी मुख्याधिकाऱ्यांमुळे विकासकामांवर परिणाम होत आहे.नगरपंचायत निर्माण झाल्यानंतर शहराचा कायापालट होईल, अशी आशा नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. परंतु ही अपेक्षा दिवास्वप्न ठरले. नगरपंचायत स्थापनेनंतर सुरूवातीला ३ जुलै ते २८ डिसंबर २०१५ पर्यंत मुख्याधिकाऱ्यांचा प्रभार तहसीलदार एस. पी. खलाटे यांच्याकडे होता. डिसेंबर २०१५ ते ऑगस्ट २०१६ पर्यंत नायब तहसीलदार आर. बी. मेश्राम, त्यांनतर ऑगस्ट २०१६ ते डिसंबर २०१६ पर्यंत केवळ ४ महिने नियमित मुख्याधिकारी सुनील कोकणी यांनी काम पाहिले. त्यानंतर परत जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१९ पर्यंत तब्बल २ वर्ष नायब तहसीलदार एस.एन. सिलमवार यांच्याकडे मुख्याधिकाऱ्यांचा प्रभार होता. त्यानंतर नोव्हेंबर ते डिसेंबर २०१९ पर्यंत तहसीलदार सुभाष यादव यांच्याकडे मुख्याधिकाऱ्यांचा प्रभार होता. मात्र पदावर असतानाच त्यांचे निधन झाले. केवळ एक महिना यांच्याकडे प्रभार होता. त्यांच्या निधनानंतर जानेवारी ते फेबु्रवारी २०२० पर्यंत सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मनुज जिंदल यांच्याकडे प्रभार असताना फेबु्रवारी २०२० ला परत नियमित मुख्याधिकारी अजय साळवे नियुक्त झाले. परंतु त्यांच्याकडे अहेरी नगरपंचायतचा प्रभार सोपविण्यात आला. एटापल्लीपेक्षा अहेरीकडे त्यांचे जास्त लक्ष असायचे. याच महिन्यात त्यांची बदली अहेरीला झाली. यादरम्यान ते केवळ ६ महिने एटापल्ली येथे कार्यरत होते. नियमित मुख्याधिकारी मिळाल्यानंतर त्यांना कायम न ठेवणे हे एटापल्ली नगरपंचायतच्या पदाधिकारी व नगरसेवकांचे अपयशच म्हणावे लागेल. आता पुन्हा एसडीओ मनूज जिंदल यांच्याकडे मुख्याधिकाºयांचा प्रभार सोपविण्यात आला आहे.एटापल्ली नगर पंचायतीला स्थायी मुख्याधिकारी मिळत नसल्याने व मिळालेले मुख्याधिकारी अहेरी नगर पंचायतीने हिरावून नेल्याने काहीसा रोष व्यक्त होत आहे.आयएएस नको, नायब तहसीलदारच हवेएटापल्ली नगर पंचायतमध्ये वारंवार मुख्याधिकारी बदलले जात असल्याने विकास कामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे न.पं.ला स्थायी मुख्याधिकारी द्यावे. या पदावर नायब तहसीलदारांची नियुक्ती करावी. त्याजागी आयएएस अधिकारी नको, असे नगरसेवक रमेश टिकले यांनी म्हटले आहे. नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आयएएस अधिकाऱ्यांच्या जागी नायब तहसीलदारांची नियुक्ती मुख्याधिकारीपदी करण्याची मागणी केली. परंतु ही मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळली. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे, असेही रमेश टिकले यांनी म्हटले आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत