शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

जन्म-मृत्यूसाठी २१ दिवसांत करा नोंदणी; आता करू शकता ऑनलाईन नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 16:15 IST

प्रशासनाकडूनही जनजागृती : स्वतंत्र वेबसाइट केली तयार

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : सध्या जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांची विविध कामांसाठी गरज भासते. त्यामुळे जन्मानंतर किंवा मृत्यूनंतर २१ दिवसांत ऑनलाइन नोंदणी करून प्रमाणपत्र घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यासाठी स्वतंत्र वेबसाइट तयार करण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीत नोंदणी नाही केली तर पुन्हा या प्रमाणपत्रांसाठी धावपळ करावी लागणार आहे.

एखाद्या बालकाचा जन्म किंवा कुटुंबातील सदस्याचा मृत्यू असो, त्याबाबतचे प्रमाणपत्र जवळील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयात नोंदणी करून घ्यावे लागते. अनेक जण हे प्रमाणपत्र घेण्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु, ऐनवेळी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी संबंधितांची धडपड सुरू होते. त्यावेळी मात्र प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्याने मानसिक त्रासही सहन करावा लागतो. ही गोष्ट टाळण्यासाठी आता शासनाने जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी पोर्टल तयार केले आहे. त्या पोर्टलवर घरबसल्याही ऑनलाइन नोंदणी करता येते. ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयातही तो अर्ज सादर करणे गरजेचे आहे. त्यानंतर प्रमाणपत्र निर्गमित केले जाते. 

ऑफलाइन अर्जही करा शासनाच्या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा. त्यानंतर संबंधिताने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयात ऑफलाइन अर्ज सादर करणेही अधिक गरजेचे आहे. जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र घेण्यासाठी २१ दिवसांत अर्ज करणे गरजेचे आहे. त्यानंतर अर्ज केला तर संबंधित बीडीओ यांची परवानगी घेऊन प्रमाणपत्र मिळवावे लागते.

"२१ दिवसांच्या आतच जन्म व मृत्यूची नोंद ग्राम पंचायतीत करता येते. यापेक्षा जास्त दिवस झाल्यास बीडीओंची परवानगी असलेले पत्र आणावे लागते. त्यामुळे वेळेवर नोंद केलेली बरी." - डी. डी. मेश्राम, निबंधक तथा ग्राम पंचायत अधिकारी 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीzpजिल्हा परिषद