शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

केबल चालकांकडून करमणूक कराची चोरी

By admin | Updated: February 3, 2015 22:56 IST

जिल्ह्यातील केबलचालकांकडून मोठ्या प्रमाणात करमणूक कराची चोरी केली जात आहे. याबाबत करमणूक विभागाकडे अनेकवेळा तक्रारी करूनही त्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने लाखो

गडचिरोली : जिल्ह्यातील केबलचालकांकडून मोठ्या प्रमाणात करमणूक कराची चोरी केली जात आहे. याबाबत करमणूक विभागाकडे अनेकवेळा तक्रारी करूनही त्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने लाखो रूपयांच्या करणूक करापासून शासनाला मुकावे लागत आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १३ हजार ५५२ केबल ग्राहक आहेत. तर ७१ केबल आॅपरेटर आहेत. नगर परिषद क्षेत्रातील प्रत्येक केबल कनेक्शनवर शासनाकडून ३० रूपये तर ग्रामीण भागातील केबल कनेक्शनवर १५ रूपये करमणूककर आकारले जाते. या कराच्या चार ते पाच पटीने केबल आॅपरेटर ग्राहकांकडून शुल्क वसूल करतात. शहरातील नागरिकांकडून जवळपास महिन्याचे १५० रूपये शुल्क आकारले जाते. यातील फक्त ३० रूपये शासनाकडे भरायचे असतानाही केबल ग्राहकांची संख्या कमी दाखवून केबल आॅपरेटर करमणूककराची चोरी करीत आहेत. यामुळे वर्षाकाठी शासनाला लाखो रूपयांचा चुना लागत आहे. केबलच्या संख्येची प्रत्यक्ष शहानिशा करण्याचे अधिकार तलाठ्यांना देण्यात आले आहेत. मात्र बरेचसे तलाठी याबाबतचा अहवाल घरबसल्या करमणूक विभागाला सादर करतात. करमणूक विभागामध्येही केवळ एकच कर्मचारी कार्यरत आहे. २०१२-१३ मध्ये ७० लाख, २०१३-१४ मध्ये ८३ लाख, एप्रिल ते डिसेंबर २०१४ पर्यंत ५४.८८ लाख रूपयांचा महसूल गोळा करण्यात आला आहे. प्रशासनाकडून तपासणी मोहीम हाती घेतल्यास फार मोठे घबाड समोर येण्याची शक्यता आहे. सेटआॅफ बॉक्स बसविण्यास गडचिरोली जिल्ह्याला मुदतवाढ दिल्याने करमणूककराची चोरी चालू राहणार आहे. (नगर प्रतिनिधी)