आष्टीत कार्यक्रम : चिनी वस्तूंवर बहिष्कार आष्टी : महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय आष्टीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शनिवारी गावातून रॅली काढून नागरिकांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचे आवाहन केले. दिवाळीनिमित्त विविध दुकानांमध्ये चिनी वस्तूंसह इतर विदेशी वस्तू आढळून येत आहेत. विदेशी वस्तूंच्या खरेदीमुळे देशाची गंगाजड कमी होते. त्यामुळे स्वदेशी वस्तूंचाच वापर करण्याचे आवाहन केले. सदर उपक्रम प्राचार्य संजय फुलझेले, डॉ. मुसने, डॉ. भारत पांडे, प्रा. शास्त्रकार, प्रा. गजभिये यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आला. प्राचार्य फुलझेले यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. (प्रतिनिधी)
स्वदेशी वस्तूंच्या जनजागृतीसाठी रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2016 02:09 IST