शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
4
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
5
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
6
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
7
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
8
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
9
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
10
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
11
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
12
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
13
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
14
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
15
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
16
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
17
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
18
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
19
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
20
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू

पावसाने पिकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 05:01 IST

१ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात सरासरी १२५४ मिमी पाऊस पडते. १ जून ते ५ जुलैपर्यंत सरासरी २७९.९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात २५४.४ मिमी पाऊस झाला आहे. अपेक्षित पावसाच्या ९०.९ टक्के पाऊस पडला आहे. म्हणजेच अपेक्षित सरासरीच्या ९ टक्के पावसाची घट झाली आहे. शनिवारपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.

ठळक मुद्दे९१ टक्के बरसला : आतापर्यंत २५४.४ मिमी पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शनिवारपासून पावसाने जिल्हाभरात हजेरी लावली आहे. त्यामुळे करपणाऱ्या पिकांना जीवदान मिळाले आहे. तसेच रोवणीच्या कामांनाही गती येणार आहे.जून महिन्यात अगदी वेळेवर पाऊस दाखल झाल्याने जिल्हाभरात धान, कापूस, सोयाबिन व इतर पिकांची लागवड वेळेवर झाली. त्यानंतर मात्र गडचिरोली तालुक्यासह काही तालुक्यांमध्ये पावसाने दडी मारली होती. त्यामुळे खरीपातील पिके करपायला सुरूवात झाली होती. शेतकरी चिंतेत पडला असतानाच मागील पाच दिवसांपासून जिल्ह्याच्या काही भागात अधूनमधून पाऊस कोसळत आहे. त्यामुळे करपणाऱ्या पिकांना जीवदान मिळाले आहे.१ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात सरासरी १२५४ मिमी पाऊस पडते. १ जून ते ५ जुलैपर्यंत सरासरी २७९.९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात २५४.४ मिमी पाऊस झाला आहे. अपेक्षित पावसाच्या ९०.९ टक्के पाऊस पडला आहे. म्हणजेच अपेक्षित सरासरीच्या ९ टक्के पावसाची घट झाली आहे. शनिवारपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी शनिवारी रात्री व रविवारी सुध्दा पाऊस झाला. त्यामुळे यानंतर पाऊस होऊन घट भरून निघेल, अशी अपेक्षा आहे.वार्षिक सरासरीच्या २० टक्के पाऊसगडचिरोली जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सरासरी १२५४ मिमी पाऊस पडते. त्यापैकी २५४.४ मिमी पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या २०.३ मिमी पाऊस पडला आहे. जुलै व आॅगस्ट हे पावसाचे दिवस म्हणून ओळखले जातात. याच कालावधीत सर्वाधिक पाऊस पडते. हे दोन्ही महिने शिल्लक आहेत. त्यामुळे पावसात असलेली घट भरून निघेल, अशी अपेक्षा आहे.मोठ्या पावसाची प्रतीक्षागडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानाचे उत्पादन घेतले जाते. सुमारे २ लाख हेक्टर क्षेत्रावर धानाची लागवड केली जाते. बहुतांश शेतकरी धानाची रोवणी करतात. धानाचे पऱ्हे रोवण्याजोगे झाले आहेत. मात्र पाऊस नसल्याने अजूनपर्यंत शेतकऱ्यांनी रोवणीला सुरूवात केली नाही. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशाच शेतकऱ्यांनी रोवणीला सुरूवात केली आहे. शेतकरी वर्ग मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. केवळ मोठ्या पावसाअभावी रोवणीची कामे थांबली आहेत.मुलचेरा व भामरागडात अतिवृष्टीशनिवारी भामरागड व मुलचेरा तालुक्यात अतिवृष्टी झाली. मुलचेरा तालुक्यात सुमारे १०७ मिमी तर भामरागड तालुक्यात ७० मिमी पावसाची नोंद झाली. रविवारीही चांगला पाऊस झाला. काही तालुक्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती