शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 00:30 IST

पाऊस अती कमी आला वा अती जास्त आला तरीही धानशेतीचे नुकसान होणार हे समीकरण ठरले आहे. परंतु यंदा ंअवेळी झालेल्या संततधार व मुसळधार पावसाने धान पीकाचे नुकसान झाले. परिणामी अतिवृष्टीने बळीराजाच्या डोळयात पाणी आणले आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । धानपीक सडले तर काही ठिकाणचे पीक पुराने झाले नष्ट; शेताला जलाशयाचे स्वरूप

लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : पाऊस अती कमी आला वा अती जास्त आला तरीही धानशेतीचे नुकसान होणार हे समीकरण ठरले आहे. परंतु यंदा ंअवेळी झालेल्या संततधार व मुसळधार पावसाने धान पीकाचे नुकसान झाले. परिणामी अतिवृष्टीने बळीराजाच्या डोळयात पाणी आणले आहे.नुकत्याच गेलेल्या सोमवारच्या रात्री, मंगळवारी दिवसभर तसेच रात्रीही जोराचा पाऊस कोसळला. त्यामुळे गाढवी नदी, नाले, बोड्या, तलाव, शेतातील बांध्यांमध्ये पाणी होतेच. या आठवड्यात आलेल्या धोधो पावसाने जलसाठ्यात आणखी मोठ्या प्रमाणात वाढ झाली. गाढवी नदीतील पाणी वाढल्याने नदीच्या काठालगतच्या शेतात नदीचे पाणी शिरले. गाढवी नदीचा जलस्तर वाढला की या नदीला येऊन भेटणारे एकलपूर-विसोरा, विसोरा-तुळशी, शंकरपुर-चोप, शंकरपुर-विठ्ठलगाव, पोटगाव-विहिरगाव या मार्गावरील सर्व लहान-मोठ्या नाल्यांचे पाणी स्थिर होते. पाणी स्थिर झाल्याने नाल्याचे पाणी नाल्याच्या चहुकडे पसरून जणू सरोवराचे रुपडे तयार झाले होते. त्यामुळे या सर्व नाल्यांच्या दोन्ही बाजूला असलेली शेती पाण्यात बुडाली. धानपीक पाण्यात बुडून राहिल्याने तसेच पाण्याच्या प्रवाहातील माती, रेती, दगड यांनी उभे धानपीक पार वाहून नेले तर काही शेतात पाणी प्रवाहात पाण्यासोबतचे गाळ, वाळू धानपिकावर पसरल्याने धानसह तुळशी, कोकडी, उसेगाव, शंकरपुर, कसारी भागातील धान वाफे करपले. उसेगाव येथील शेतकरी गोपाल बोरकर यांनी तर ट्रँक्टर ट्रॉलीत प्लास्टिक ताडपत्री टाकून त्यात पाणी भरून धान पºहे वाचविले. संततधार, मुसळधार, रिमझिम असा पाऊस शेतीसह शेतकरी आणि साऱ्यांना सुखावून गेला. जुलैच्या मध्यापर्यंत कोरडे पडलेले जलसाठे पाण्याने भरू लागले. पुनर्वसु नक्षत्रात पावसाने दडी मारल्यामुळे आधीच करपलेले धानपºहे पुष्य नक्षत्राच्या पाण्याने कसेबसे वाचले. रोवणी झाली आणि आता ही अतिवृष्टी झाल्याने धान सडून गेले त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. झालेल्या नुकसानीची पाहणी करून शासनाकडून नुकसानभरपाई मिळण्याची मागणी आहे. विहिरगाव येथील शेतकरी दिनकर करंबे, नामदेव भुते, पांडुरंग पत्रे, मंसाराम दोनाडकर, गौतम शेंडे, मनोहर नाकतोडे, गोपीनाथ ठाकरे, दिवाकर दोनाडकर, विनायक गुरुनुले आदींचे धान पीक पुरात नष्ट झाले.यंदा पाऊस विलंबाने पडला. आमची शेती वरच्या पावसावर अवलंबून असल्याने धान पेरणी उशीरा झाली. मागील महिन्यात सुरूवातीला पाऊस झाला नाही. त्यामुळे धान वाढले. त्यानंतर पाऊस झाला. धान पºहे वाचले. आता रोवणी झाल्यावर मुसळधार पाऊस बरसला त्यामुळे धान पीक खराब झाले.सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी आमची मागणी आहे.- प्रवीण दोनाडकर, शेतकरी, विहिरगाव

टॅग्स :agricultureशेती