शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

वार्षिक सरासरीच्या ८२ टक्के पाऊस झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 23:34 IST

यावर्षी सुरूवातीला पावसाने चांगलाच दगा दिला. बरेच दिवस पाऊस न झाल्याने पेरणीची कामे थांबली होती. पावसाला सुरूवात झाल्यानंतर पाऊस थांबत नव्हता. त्यामुळे पेरणीची कामे लांबली होती. काही शेतकऱ्यांचे कापूस पेरणी, धानाचे पऱ्हे टाकण्याचे काम लांबले होते.

ठळक मुद्देमहिनाभरापासून संततधार : सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जून ते सप्टेंबर या कालावधीत सर्वसाधारणपणे १३५४.७ मिमी पाऊस पडते. यावर्षी २५ ऑगस्टपर्यंत १०९२.८ मिमी पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या सुमारे ८०.७ मिमी पाऊस पडला आहे. ऑगस्ट महिन्याचे सहा दिवस व पूर्ण सप्टेंबर महिना शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षी वार्षिक सरासरीच्या अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.अपवाद वगळता ऑगस्ट महिन्यातील प्रत्येक दिवशी पाऊस झाला. या महिन्यात तब्बल ५३२.७ मिमी पाऊस पडला आहे. ऑगस्ट महिन्यात पडणाऱ्या सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत सुमारे १५२ टक्के पाऊस झाला आहे.यावर्षी सुरूवातीला पावसाने चांगलाच दगा दिला. बरेच दिवस पाऊस न झाल्याने पेरणीची कामे थांबली होती. पावसाला सुरूवात झाल्यानंतर पाऊस थांबत नव्हता. त्यामुळे पेरणीची कामे लांबली होती. काही शेतकऱ्यांचे कापूस पेरणी, धानाचे पऱ्हे टाकण्याचे काम लांबले होते. जवळपास ८ ते १० दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पावसाला सुरूवात झाली.जुलै महिन्यातही चांगलाच पाऊस पडला. जून, जुलै महिन्यात ७०२.१ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ५६० मिमी पाऊस पडला होता. म्हणजेच सर्वसाधारणच्या तुलनेत २० टक्के पाऊस कमी झाला. मात्र ही कसर ऑगस्ट महिन्यातील पावसाने भरून काढली.आॅगस्ट महिन्यात तर पावसाने कहरच केला. प्रत्येक दिवशी पाऊस येत आहे. कधी मुसळधार तर कधी संततधार सुरू आहे. ऑगस्ट महिन्यात सर्वसाधारण ३५१ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. यावर्षी मात्र या महिन्यात ५३२.७ मिमी पाऊस झाला आहे. सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत यावर्षी सुमारे १५१.८ मिमी पाऊस पडला आहे.ऑगस्टमध्ये ५३३ मिमी पाऊसऑगस्ट महिन्यात अपवाद वगळता प्रत्येक दिवशी पाऊस झाला. १ ते २५ ऑगस्ट या कालावधीत जिल्हाभरातील ५३२.७ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. या महिन्यात सर्वसाधारपणे ५५१ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. अपेक्षित पावसाच्या १५१.८ टक्के पाऊस झाला आहे.सततच्या पावसाने नागरिक त्रस्तऑगस्ट महिन्याच्या अगदी सुरूवातीपासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांमधील तलाव अर्धेही भरले नसल्याची ओरड आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील तलाव, नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. सततच्या पावसाचा परिणाम पिकांवर होत आहे. ऊन निघत नसल्याने धान पिकाची वाढ खुंटली आहे. तर कपाशी, सोयाबिन, तूर पिकांच्या शेतामध्ये पाणी साचली असल्याने या पिकांची तर वाट लागली आहे. या पिकांच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे. मागील वर्षी सुध्दा कापसाचे उत्पादन झाले नव्हते. यावर्षी सुध्दा कापूस दगा देणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

टॅग्स :Rainपाऊस