शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडिलांशी भांडण, युवतीने केले विष प्राशन; वेळेवर उपचार झाला असता तर वाचला असता जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 14:24 IST

उपचारादरम्यान मृत्यू : कमलापुरातील घटना; दोन्ही वैद्यकीय अधिकारी होते गैरहजर

लोकमत न्यूज नेटवर्क कमलापूर : युवती व आई-वडिलांमध्ये घरगुती कारणावरून भांडण झाले. तेव्हा आईने मीच विष पिऊन मरते, अशी धमकी मुलीला दिली. याचवेळी रागाच्या भरात मुलीने कीटकनाशक प्राशन केले. युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ही घटना अहेरी तालुक्याच्या कमलापूर येथे रविवार, ८ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. करुणा पोचमलू निर्ला (२०) रा. कमलापूर, असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. कमलापूर येथील निर्ला कुटुंबात करुणा हिचे आई-वडिलांशी भांडण झाले. भांडण अधिकच विकोपाला गेले. तेव्हा आईने मीच विष प्राशन करून मरते, अशी धमकी मुलीला दिली. आईने बोलल्याचे शब्द मुलीच्या मनाला बोचले. नंतर तिने रागाच्या भरात कीटकनाशक प्राशन केले. शेतातील पिकांवर फवारणी करण्यासाठी पावसाळ्यात हे कीटकनाशक आणलेले होते. यापैकी काही शिल्लक होते. मुलीने विष प्याल्याची बाब काही वेळानंतर कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तिला कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविले; परंतु येथे कार्यरत असलेले दोन्ही वैद्यकीय अधिकारी हजर नव्हते. शिवाय येथील रुग्णवाहिकासुद्धा दुरुस्तीसाठी गडचिरोली येथे पाठविली होती. तेव्हा प्रभारी वैद्यकीय अधिकारी राजेश मानकर यांच्याशी काही लोकांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधल्यानंतर त्यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून खासगी वाहन उपलब्ध करून दिले. तोपर्यंत बराच उशीर झाला. करुणाला अहेरी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 

'पीएचसी'मध्ये उपचार झाला असता तर वाचला असता जीव कमलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी आहेत. एकातरी वैद्यकीय अधिकाऱ्याने २४ तास उपलब्ध असावे, असा नियम आहे; परंतु रविवारी दोन्ही वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नव्हते. त्यामुळे करुणावर वेळीच उपचार झाला नाही. वेळेवर उपचार झाला असता तर करुणाचा जीव वाचला असता, असा आरोप करीत सरपंच श्रीनिवास पेंदाम यांनी डॉक्टरांची वरिष्ठांकडे तक्रार केलेली आहे.

 

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीCrime Newsगुन्हेगारी