शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
7
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
8
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
9
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
10
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
11
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
12
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
13
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
14
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
15
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
16
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
17
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
18
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
19
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
20
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!

लहान कुटुंबांबाबत व्हावी जनजागृती

By admin | Updated: July 11, 2017 00:43 IST

जिल्ह्याची लोकसंख्या मागील दहा वर्षात १ लाख २ हजार ६१० ने वाढली़ परंतु लोकसंख्या वाढीच्या वेगाने जिल्ह्याच्या विकासाचा वेग वाढला नाही़...

जागतिक लोकसंख्या दिन : वाढत्या लोकसंख्येचा संसाधनांवर परिणामलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याची लोकसंख्या मागील दहा वर्षात १ लाख २ हजार ६१० ने वाढली़ परंतु लोकसंख्या वाढीच्या वेगाने जिल्ह्याच्या विकासाचा वेग वाढला नाही़ त्यामुळे २०११ च्या जनगणनेत तब्बल १० लाख ७२ हजार ९०४ लोकसंख्येचा हा जिल्हा विकासाच्या क्षेत्रात अद्यापही पिछाडीवरच आहे़ लहान कुटुंबाबत ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. २००१ च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या ९ लाख ७० हजार २९४ होती़ यात ४ लाख ९१ हजार १०१ पुरूष व ४ लाख ७९ हजार १९३ महिलांचा समावेश होता़ जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्या आजही ग्रामीण भागातच आहे़ २००१ मध्ये ग्रामीण भागाची लोकसंख्या ९ लाख ३ हजार ३३ होती़ यात ४ लाख ५६ हजार ६४७ पुरूष व ४ लाख ४६ हजार ३८६ महिलांचा समावेश होता़ शहरी भागात ६७ हजार २६१ लोकसंख्या होती़ या शहरी लोकसंख्येत ३४ हजार ४५४ पुरूष व ३२ हजार ८०७ महिला होत्या़ २०११ च्या जनगणनेत ग्रामीण व शहरातील लोकसंख्येत बरीच वाढ झाली़ नव्या जनगणनेनुसार ग्रामीण भागाची लोकसंख्या ९ लाख ५३ हजार ८५८ आहे़ यात पुरूष ४ लाख ८२ हजार ७४० व महिला ४ लाख ७१ हजार २२७ महिला आहेत़ शहरी भागात वाढीसह १ लाख १८ हजार ९३७ लोकांची नोंद झाली आहे़ यात ६० हजार ७३ पुरूष व ५७ हजार ८६४ महिलांचा समावेश आहे़ २०११ च्या नव्या जनगणनेत जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची लोकसंख्याही नमूद करण्यात आली आहे़ आदिवासीबहुल असलेल्या या जिल्ह्यात आदिवासींची संख्या तिप्पट आहे़ जिल्ह्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या १ लाख २० हजार ७४५ आहे. यात पुरूष ६१ हजार ४१ व महिला ५९ हजार ७०५ आहेत. तसेच अनुसूचित जमातीची लोकसंख्या तिप्पट म्हणजे ४ लाख ५३ हजार ३०६ आहे. पुरूष २ लाख ७ हजार ३७७ व महिलांची लोकसंख्या २ लाख ७ हजार ९२९ आहे. असे नमुद करण्यात आले आहे.बालकांचा जन्मदर घटला२०११ च्या राष्ट्रीय जनगणनेनुसार बालकांच्या जन्मदरात घट झाली आहे़ २००१ च्या जनगणनेत १ लाख ५४ हजार ७४४ बालके होती़ यात ७८ हजार ७२४ मुले आणि ७६ हजार २० मुलींचा समावेश होता़ २०११ च्या जनगणनेनुसार बालकांची संख्या १ लाख १५ हजार १०४ आहे़ यात ५८ हजार ८४२ मुले व ५६ हजार २६२ मुलींचा समावेश आहे़ ग्रामीण भागात ५२ हजार ७९४ मुले व ५० हजार ७०९ मुली अशी एकू १ लाख ३ हजार ५०३ बालके आहे़ शहरी भागात ६ हजार ४८ मुले व ५ हजार ५५३ मुली अशी एकूण ११ हजार ६०१ बालके आहेत़