मागील काही वर्षांपासून अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, रोगराई यामुळे धान पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे बरेच शेतकरी उगवण क्षमता कमी असलेली बियाणे पेरणीसाठी ठेवत नाही. त्यांना दरवर्षी नवीन बियाणे वापरावे लागते. अनेक शेतकरी पारंपरिक बियाणे न वापरता संकरित बियाणे वापरतात. तरीसुद्धा कोणत्या न कोणत्या कारणाने धान शेतीचे नुकसान हाेतच असते. मात्र संबंधित विभागाकडून आणेवारी मात्र जास्त दाखवण्यात येते. त्यातच कमी भावामुळे लागवड खर्च भरून निघत नाही. त्यातच मागील वर्षी धान पिकावर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला होता. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. शेतमालाला लागवड खर्चावर आधारीत भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडे पैसा शिल्लक राहत नाही. मागील वर्षीपासून काेराेनाचे संकट असल्याने शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात धान बियाणे उपलब्ध करावे, अशी मागणी मुरखळा मालचे शेतकरी माणिक बुरे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
सवलतीच्या दरात बियाणे उपलब्ध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:38 IST