शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
3
पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत
4
दलाई लामांना ड्रॅगन-विळखा
5
यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
6
कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
7
लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
8
बनावट लेटरहेडद्वारे आमदार निधी लाटल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; आ. प्रसाद लाड यांच्या तक्रारीवरून तपास सुरू
9
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
10
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
11
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
12
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
13
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
14
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
15
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
16
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
17
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
18
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
19
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
20
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल

‘प्रोजेक्ट विकास’मुळे नक्षल चळवळ बॅकफूटवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:09 IST

साडेचार महिन्यांपूर्वी गडचिरोली पोलीस विभागाचे प्रमुख म्हणून धुरा स्वीकारताना गोयल यांनी या जिल्ह्यातील नक्षलवाद कमी करण्याचे आव्हानात्मक काम स्वीकारले. ...

साडेचार महिन्यांपूर्वी गडचिरोली पोलीस विभागाचे प्रमुख म्हणून धुरा स्वीकारताना गोयल यांनी या जिल्ह्यातील नक्षलवाद कमी करण्याचे आव्हानात्मक काम स्वीकारले. हे आव्हान पेलताना त्यांच्या काय योजना आहेत आणि त्यांची अंमलबजावणी कशा पद्धतीने करणार याबाबत लोकमतला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक बाबी स्पष्ट केल्या. नक्षलवादाला नियंत्रित करताना एकावेळी अनेक आघाड्यांवर काम करावे लागते. नक्षलवाद्यांच्या गोळीला गोळीने उत्तर देण्यासोबत त्यांना कुठेच आश्रय मिळणार नाही अशी व्यवस्था केली जात आहे. त्यासाठी मंदावलेल्या विकासाच्या प्रक्रियेला गती देणे हेच एक आव्हान आहे. नक्षल्यांनी कितीही अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तरी ते आता दुर्गम भागातील विकासाची प्रक्रिया थांबवू शकणार नसल्याचे ते म्हणाले.

मुळात आता नक्षलवाद्यांची संख्या अतिशय कमी झाली आहे. त्यांच्या चळवळीत जाण्यासाठी युवा वर्ग तयार नाही. त्यामुळे छत्तीसगडमधील लोकांची भरती करून त्यांना इकडे पाठविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण हे करताना गावकऱ्यांशी त्यांचा पूर्वीसारखा संपर्क राहिलेला नाही. असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्यामुळे सतत त्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊन आपले स्थान बदलवत राहावे लागते. यातून त्यांच्यात पूर्वीसारखी एनर्जीही राहिलेली नाही. त्यामुळे आत्मसमर्पणाचे प्रमाण वाढले आहे. अनेकांना अटक झाली, तर काही चकमकीत मारले गेले. नक्षलवाद्यांचे मनुष्यबळच नाही तर मनोबलही कमी झाले आहे. हे पोलीस यंत्रणेचे मोठे यश असल्याचे पोलीस अधीक्षक गोयल म्हणाले.

जिल्ह्यात इतर गुन्ह्यांच्या नियंत्रणासाठी पोलीस दलाकडे मनुष्यबळाची कमतरता आहे का, याबद्दल ते म्हणाले, ही परिस्थिती राज्यात सर्वत्रच आहे. यावर्षी कोविड-१९ मुळे निधीची थोडी कमतरता आहे. तरीही कुठलेही काम अडणार नाही याची काळजी घेतली जात आहे. या जिल्ह्यात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना ऐच्छिक ठिकाणी जाण्याची मुभा आहे आणि त्याची अंमलबजावणी बऱ्याच प्रमाणात होते. यावर्षी कोविडच्या परिस्थितीमुळे बदल्यांना उशिर झाला असला तरी दरवर्षी असे होत नसल्याचे त्यांनी सांगितले.

आत्मसमर्पितांसाठी ‘ब्रिज कोर्स’चा प्रस्ताव

आतापर्यंत ६०० वर नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यातील बहुतांश लोक पाचवी ते सातवीपर्यंत शिकलेले आहेत. त्यांना आयटीआयसारखे व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यासाठी किमान दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्यातून मध्यम मार्ग काढून त्यांना आयटीआय प्रवेशासाठी दहावीशी समकक्ष ठरेल असा ‘ब्रिज कोर्स’ करण्याची मुभा मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला असल्याची माहिती यावेळी पोलीस अधीक्षकांनी दिली.

दुर्गम भागातील युवक-युवतींना रोजगार

नागरी कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून दुर्गम भागातील युवक-युवतींना विविध ठिकाणी रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यात ४०० जणांना सुरक्षा रक्षक, १५० जणांना हॉटेल आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात, १५० युवतींना नर्स म्हणून नोकरी मिळवून दिली. ३१५ दिव्यांगांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र, १२० जणांना मत्स्य व कुकुटपालनाचा व्यवसाय अशा माध्यमातून जोडण्यात आले. याशिवाय लाहेरीसारख्या दुर्गम भागात आधार नोंदणी शिबिर घेऊन नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्याचा मार्ग प्रशस्त केल्याचे गोयल यांनी सांगितले.