शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
3
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
4
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
5
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
6
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
7
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
8
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
9
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
10
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
11
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
12
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
13
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
14
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
15
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
16
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
17
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
18
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
19
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
20
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या समस्या प्राधान्याने मार्गी लावा

By admin | Updated: October 15, 2016 01:37 IST

दैनंदिन प्रशासकीय कामात दिरंगाई न करता कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या समस्या प्राधान्याने

अहेरी : दैनंदिन प्रशासकीय कामात दिरंगाई न करता कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या समस्या प्राधान्याने कमी वेळात मार्गी लावा, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी अहेरी उपविभागातील अधिकाऱ्यांना दिले. महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराच्या नियोजनाबाबत शुक्रवारी अहेरीच्या नगर पंचायत कार्यालयात आढावा बैठक पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी बैठकीला अहेरीचे तहसीलदार एस. एन. सिलमवार, संवर्ग विकास अधिकारी सुनील तडस, अहेरीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार उपस्थित होत्या. यावेळी पालकमंत्री आत्राम यांनी मुद्रा लोन, अपंगांच्या समस्या, घरकूल लाभार्थ्यांच्या अडचणी, कर्ज वाटप, परवाना, सिंचन समस्या, विविध प्रकारची दाखले, कृषी साहित्य वाटप, वीज समस्या, विद्यार्थ्यांसाठीची एसटी पास योजना, वनहक्क पट्टे, रस्ते, आरोग्य सुविधा याबाबतची माहिती घेतली. तसेच आदिवासी विकास प्रकल्पाच्या योजनांची अंमलबजावणी, अपंगांना तीनचाकी सायकल वाटप आदींचाही आढावा त्यांनी घेतला. पुढील महिन्यात महसूल विभागातर्फे अहेरी येथे महाराजस्व अभियान घेण्यात येणार आहे. या शिबिरात अहेरी उपविभागातील जास्तीत जास्त नागरिकांना योजनेचा लाभ घेता यावा, याकरिता सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे, तसेच काही नवीन योजना अंमलात आणाव्या, असे निर्देश पालकमंत्री आत्राम यांनी यावेळी दिले. सदर बैठकीचे आभार तलाठी चांदेकर यांनी केले. अहेरी उपविभागातील एकूण १६ हजार ३८३ लाभार्थ्यांना समाधान शिबिराचा लाभ देण्यात आल्याबद्दल पालकमंत्री आत्राम यांनी महसूल व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले. सदर आढावा बैठकीला समाजकल्याण, वन, कृषी, पंचायत समिती, उपप्रादेशिक परिवहन, भूमी अभिलेख, आरोग्य, आदिवासी विकास प्रकल्प, विद्युत, विविध राष्ट्रीयकृत बँक तसेच एसटी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)