विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. रामटेक येथील बी.ए. प्रथम वर्षाची विद्यार्थिनी सोनिया दीपक वानखेडे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक महिला कला-वाणिज्य महाविद्यालय, चांदुर रेल्वेची बी.ए. तृतीयची विद्यार्थिनी अश्विनी अरुण पाटील हिने तर तृतीय क्रमांक चिमूरचा एम.कॉम. प्रथम वर्षाचा विद्यार्थी सचिन नुकडू मसराम याने पटकाविला.
प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा यांचे अध्यक्षतेखाली व प्रा.डॉ. एच.एम. कामडी, प्रा. डॉ. जयदेव देशमुख, प्रा. रमेश धोटे यांचे प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. महाविद्यालयाने सत्र २०२०-२१ मध्ये आयोजित ‘वर्तमान परिस्थितीत महात्मा गांधींच्या विचारांची गरज’ या विषयावरील गोंडवाना विद्यापीठ स्तरीय वक्तृत्व स्पर्धा व एकल नृत्य स्पर्धा देखील आयोजित केली होती. या स्पर्धेतील
प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे रुपये ७५०, ५००, ३५० किमतीचे ग्रंथ साहित्य व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तिन्ही स्पर्धांतील सहभागी सर्व स्पर्धकांना स्पर्धा सहभागीता प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष प्रभारी प्रा. डॉ. श्रीराम गहाणे यांनी संचालन तर महिला सक्षमीकरण विभाग प्रमुख प्रा. डॉ. हितेंद्र धोटे यांनी आभार मानले.