शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

रणधुमाळी विधानसभेची अन् मोर्चेबांधणी जिल्हा परिषदेची

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 15:58 IST

डावपेच : दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांना आकर्षित करण्याची खेळी

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापत असतानाच दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विधानसभेच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांची पायाभरणी केली जात आहे. पदाधिकाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांकडून आताच कोणाला उमेदवारी तर कोणाला पदांचे आश्वासन देण्याचा सपाटा लावला आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात मिनी मंत्रालयाचे मोठे महत्त्व आहे. हे सभागृह ग्रामीण भागाचे सत्ताकेंद्र मानले जाते. यासोबत शहरी भागात नगरपालिका व नगरपंचायतीतील सत्तेचेही महत्त्व आहेच. सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला मताधिक्यात भर घालण्याची क्षमता ठेवणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना हेरण्याचे काम महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार व प्रमुख नेतेमंडळींकडून सुरू आहे. 

अशा पदाधिकाऱ्यांना खास भेटीचे निमंत्रण, उमेदवारी तसेच सत्ता आल्यास पद देण्यात येईल, असा शब्दही आतापासूनच दिला जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात कोलांटउड्या पाहावयास मिळणार आहेत. यामध्ये कोण कोणाचे शिलेदार आपल्याकडे खेचतो, कोण कोणाला शह देतो, हे लवकरच कळणार आहे. 

शहरी भागातही कार्यकर्त्यांची जुळवाजुळवगडचिरोली, आरमोरी व देसाईगंजात नगरपालिका असून इतर तालुका मुख्यालयी नगरपंचायती आहेत. सर्वच ठिकाणी नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांना आपल्याकडे वळविण्याची रणनीती आखली जात आहे. सोबतच जातीय समीकरणांनुसार कोण फायद्याचा, कोण तोट्याचा असा हिशेबही लावला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बंडखोरीनंतर आता दगाफटक्याचा धोका जिल्ह्यात महायुती व महाविकास आघाडीत बंडखोरी मोठ्या प्रमाणात उफाळून आली. बंडखोरांनी थेट अपक्ष उमेदवारी दाखल करून शड्डू ठोकला. काही प्रमुख पक्षांचे महायुतौ व महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या नेत्यांशी विळ्ळ्या-भोपळ्ळ्याचे नाते आहे. अशा परिस्थितीत बंडखोरीनंतर मित्रपक्षांकडून दगाफटक्याचा धोका देखील आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Gadchiroliगडचिरोली