शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

भामरागडमध्ये पोस्टिंग म्हणजे शिक्षा नव्हे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 18:52 IST

Gadchiroli News अनेक सोयीसुविधांपासून वंचित असलेल्या भामरागडमध्ये पोस्टिंग म्हणजे अनेकांना शिक्षा वाटत असते. वास्तविक अशा दुर्गम भागात राहूनसुद्धा आपला वेळ सत्कारणी लावला जाऊ शकतो, असे मत ज्येष्ठ समाजसेवी पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘लक्ष्यवेध’ पुस्तकाचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा

 

गडचिरोली : अनेक सोयीसुविधांपासून वंचित असलेल्या भामरागडमध्ये पोस्टिंग म्हणजे अनेकांना शिक्षा वाटत असते. वास्तविक अशा दुर्गम भागात राहूनसुद्धा आपला वेळ सत्कारणी लावला जाऊ शकतो, असे मत ज्येष्ठ समाजसेवी पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले. (Posting in Bhamragad is not a punishment ... Dr Prakash Amte)

राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि स्तंभलेखक डॉ.संतोष डाखरे यांच्या ‘लक्ष्यवेध’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या सोहळ्यात डॉ.प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांच्याहस्ते सदर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कोरोना कालावधीतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींचा वेध घेणारे हे पुस्तक स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह सर्व अभ्यासकांना उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी डॉ. आमटे यांनी व्यक्त केला.

राज्यशास्त्र प्राध्यापक परिषदेच्या विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ.अलका देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्यशास्त्र प्राध्यापक परिषदेचे अध्यक्ष डॉ.प्रमोद पवार, डॉ. कमल सैनी (राजस्थान), डॉ. विवेककुमार हिंद (बिहार), डॉ. संपदा कुल्लरवार, पुस्तकाचे लेखक डॉ. संतोष डाखरे उपस्थित होते. पुस्तकाचे समीक्षण डॉ. संदीप तुंडूरवार यांनी केले आहे.

या कार्यक्रमाचे संचालन डॉ.मंगेश आचार्य तर आभार डॉ.रवी धारपवार यांनी मानले.

टॅग्स :Dr Prakash Baba Amteडॉ. प्रकाश बाबा आमटे