शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

कोरोनाचे संकट पळविण्यासाठी गडचिरोलीत पुजाअर्चनेचा प्रयत्न; प्रशासनाचा वेळीच हस्तक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 19:27 IST

कोरोना आजाराचे संकट हा दैवी प्रकोप ठरवून तो दूर करण्यासाठी सामूहिक पुजाअर्चना करण्याचा प्रयत्न कुरखेडा तालुक्यातील पळसगड येथे काही लोकांकडून झाला. परंतू याबाबतची कुणकुण लागताच तहसीलदारांनी पोलीस व मंडळ अधिकाऱ्यांमार्फत गावकऱ्यांची समजूत काढत सामूहिक पुजा करण्यास मनाई केली.

ठळक मुद्देएकत्रित येण्यास केली मनाई

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोना आजाराचे संकट हा दैवी प्रकोप ठरवून तो दूर करण्यासाठी सामूहिक पुजाअर्चना करण्याचा प्रयत्न कुरखेडा तालुक्यातील पळसगड येथे काही लोकांकडून झाला. परंतू याबाबतची कुणकुण लागताच तहसीलदारांनी पोलीस व मंडळ अधिकाऱ्यांमार्फत गावकऱ्यांची समजूत काढत सामूहिक पुजा करण्यास मनाई केली.पळसगड (सलंगटोला) येथे गावाबाहेरील डोंगरावर शंकराचे मंदिर आहे. त्या ठिकाणी सामूहिक पुजा केल्यास कोरोनाचे संकट दूर होईल अशी आवई उठविण्यात आली आणि त्यानुसार परिसरातील गावातील लोकांनाही या पुजेत सहभागी करून घ्यावे, असे काही लोकांनी सूचविले. परंतू प्रत्यक्षात तसे होण्याआधीच प्रशासनाला याची माहिती मिळाली. त्यामुळे तहसीलदार सोमनाथ माळी यांनी पोलीस आणि महसूल विभागाच्या कर्मचाºयांना गावकऱ्यांची समजूत काढण्यासाठी पाठविले. अशा पद्धतीने एकत्रित येणे सध्या बेकायदेशिर असल्याचे निदर्शनास आणून दिले. जी काही पुजा करायची असेल ती कोणी एका-दोघांनीच करावी, असे सांगण्यात आले. त्यामुळे सामूहिक पुजेचा तो बेत रद्द करण्यात आला.दरम्यान अशा पद्धतीने गावकऱ्यांच्या मनात भिती निर्माण करून पुजेच्या नावावर अनेक लोकांना एकत्रित करणे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासोबतच अनेकांच्या आरोग्यास अपायकारक ठरू शकते. प्रशासनाने आणि लोकांनीही पुढेही सावध राहून अशा पद्धतीचा प्रयत्न हाणून पाडावा, अशी अपेक्षा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी आणि गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य अ‍ॅड. गोविंद भेंडारकर यांनी व्यक्त केली. तर असा कोणताही प्रकार गावात होणारच नव्हता. केवळ त्याबाबतची अफवा पसरविण्यात आल्याचे या भागाचे जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस