शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
3
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
4
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
5
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
6
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
7
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
8
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
9
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
10
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
11
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
12
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
13
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
14
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
15
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!
16
Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
17
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
18
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
19
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
20
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे

पोलीस चकमकीत नक्षल्यांचे शिबीर उद्ध्वस्त, घातपाताचे साहित्य जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 12:13 IST

उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र ताडगाव हद्दीतील मौजा मडवेली जंगल परिसरात विशेष अभियान पथकाचेे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना पेरमिली दलमच्या नक्षलवाद्यांनी पोलीस जवानांच्या दिशेने गोळीबार केला.

ठळक मुद्देचकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले. त्यात घटनास्थळाच्या निरीक्षणावरून अंदाजे 35 ते 40 नक्षलवादी शिबीर लावून होते असे दिसून आले.

गडचिरोली : नक्षलवाद्यांकडून विलय दिनाच्या पार्श्वभूमीवर घातपात घडविण्याचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला.भामरागड तालुक्यातील जंगलात रविवारी झालेल्या चकमकीत नक्षलींचे शिबीर उद्ध्वस्त झाले. यात कोणी जखमी झाले नसले तरी त्यानंतर राबविलेल्या शोधमोहीमेत घातपातासाठी वापरले जाणारे साहित्य पोलिसांच्या हाती लागले. 

उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र ताडगाव हद्दीतील मौजा मडवेली जंगल परिसरात विशेष अभियान पथकाचेे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना पेरमिली दलमच्या नक्षलवाद्यांनी पोलीस जवानांच्या दिशेने गोळीबार केला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल नक्षलवाद्याांच्या दिशेने गोळीबार केला. जवानांचा वाढता दबाव पाहुन नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलात पळ काढला.  21 सप्टेंबर रोजी होणाऱ्या विलय दिनाच्या पार्श्वभुमीवर पेरमिली दलमच्या नक्षलवाद्यांनी आयईडी व कुकर बॉम्ब लावुन मोठी घातपाताची योजना आखली होती. जवानांच्या सतर्कतेमुळे नक्षलवाद्यांचा कुटील डाव उधळून लावण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले.

आयईडी, कुकर बॉम्ब केले नष्ट

चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले. त्यात घटनास्थळाच्या निरीक्षणावरून अंदाजे 35 ते 40 नक्षलवादी शिबीर लावून होते असे दिसून आले. घटनास्थळावरून आयईडी, कुकर बॉम्ब, पिट्टू बॅग व नक्षल साहित्य हस्तगत करण्यात आले. आयईडी व कुकर बॉम्ब जागेवरच नष्ट करण्यात आले. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक अहेरी (अभियान) मनिष कलवानिया, अपर पोलिस अधीक्षक समीर शेख (प्रशासन), सी-60 प्रभारी अभिजीत पाटील यांनी हे अभियान यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. दरम्यान, विशेष अभियान पथकाच्या या कामगिरीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी कौतुक करत नक्षलविरोधी अभियान तिव्र करण्याचे निर्देश दिले. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादीPoliceपोलिस