शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

आदिवासी तरूणावर पोलिसांनी झाडल्या गोळ्या

By admin | Published: September 25, 2015 1:59 AM

एटापल्ली तालुक्यातील गट्टेपल्ली येथील रहिवासी बिरसू राजू आत्राम या २७ वर्षीय तरूणावर पेरमिली येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानाने गोळ्या झाडल्या.

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : पेरमिली पोलीस ठाण्यांतर्गत घटना; चौकशीची मागणीगडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील गट्टेपल्ली येथील रहिवासी बिरसू राजू आत्राम या २७ वर्षीय तरूणावर पेरमिली येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानाने गोळ्या झाडल्या. यात उजव्या हाताच्या मनगटाला गंभीररित्या इजा झाली आहे. संबंधित केंद्रीय पोलीस दलाचे अधिकारी व जवान तसेच पेरमिली पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बिरसू राजू आत्राम यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.आत्राम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २० सप्टेंबर रोजी रविवारी पेरमिलीवरून चंद्रा येथे आपले मित्र मिथून लक्ष्मण मडावी यांना घरी सोडून देण्यासाठी रात्री ८.३० वाजता मोटार सायकलने जात असताना चंद्रा ते गट्टेपल्ली जंगलात रस्त्यात रात्रीच्या अंधारात लपून बसलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी आपल्या आवाज दिला. तेव्हा आपण थांबलो व मागे वळून पाहिले, तेव्हा सडकेच्या कडेला झुडूपातून दोन बंदुकधारी जवान जवळ येताना दिसले. त्यांनी माझ्याजवळ उभे राहून कोणतीही विचारपूस न करता बंदुकीतून दोन फैरी झाडल्या. त्यातील काही गोळ्या माझ्या उजव्या हाताच्या मनगटला लागल्या व बोटांना जखम झाली आहे. गोळीच्या आवाजामुळे काही वेळ आपले कान बधिर झाले होते. त्यानंतर आपल्या उजव्या हातातून रक्त वाहत असल्याचे पाहून जवळच्या औषधीपैकी एक मलम लावायला दिला. मात्र ओळख दिली नाही. दोन किमी अंतर जखमी अवस्थेत पायी चालायला लावले. त्यानंतर आपल्याला पेरमिली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथील आरोग्य केंद्रात नेऊन उपचार करण्यात आले व रात्री येथेच झोप म्हणून सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी २१ सप्टेंबर रोजी मला कुठल्याही रूग्णालयात नेण्यात आले नाही. सकाळी ९ वाजता पेरमिली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी मला वारंवार विचारणा करू लागले. तू घरी जाऊन कुटुंबियांना काय सांगशील, अशी त्यांनी विचारणा केली. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला लाच देण्याची आमिषही दाखविली व आलापल्ली येथून मित्रासोबत दारू पिऊन येत असताना मोटारसायकलला अपघात झाला व आपण जखमी झालो, असे सांग असे ते म्हणाले. तुझ्याजवळ वाहन चालविण्याचा परवाना नाही. तुझ्या गाडीचे ब्रेक फेल आहे व तू घटनेच्या ठिकाणी एकटाच होता. सीआरपीएफचे १०० जवान होते. तुझ्यावर कोणतीही बनावट केस दाखल करू शकतो, असेही ते म्हणाले, असे आत्राम याने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे व आपल्या हातावर १० हजार रूपये ठेवले व २१ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजता घरी जाण्यास सांगितले. आपल्यावर सीआरपीएफ जवानाकडून झालेल्या गोळीबार प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व पेरमिली पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी बिरसू आत्राम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.उपपोलीस स्टेशन पेरमिली अंतर्गत २० सप्टेंबर रात्री चंद्रा-गट्टेपल्ली मार्गावर पेट्रोलिंग चालू असताना रात्री ८ वाजता बिरसू राजू आत्राम रा. गट्टेपल्ली हा व्यक्ती सूसाट वेगाने दुचाकीने येत होता. त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो थांबला नाही. घाबरून खाली कोसळला व हाताला मारला लागला. तो दारूच्या नशेत होता. त्याला आमच्या पोलीस पार्टीकडून मदतीच्या आधारे पेरमिली आरोग्य केंद्रात आणून प्रथमोपचार करून घरी पोहोचविण्यात आले. त्याच्यावर गोळीबार वगैरे कोणत्याही प्रकारची घटना झाली नाही. - चांगदेव कोळेकर, ठाणेदार, उपपोलीस ठाणे पेरमिली.