शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

खर्राविक्रेत्यांवर अंकुश आणण्यासाठी पोलिसांचे धाडसस्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST

१ फेब्रुवारी २०१९ पासून सिरोंचा शहरातील ७० पानठेलाधारकांनी खर्राविक्री बंद केली. यातील ६८ जणांनी पानठेलेच बंद केले तर दोन पानठेलाधारक केवळ पान विकतात. असे असले तरी चोरट्या मार्गाने चहा टपऱ्या, रस्त्यावरील उपहारगृहे व इतरही लहान मोठ्या दुकानांमध्ये खर्रा विक्री होत असल्याचे सांगितले जाते.

ठळक मुद्देतपासणी मोहीम : खर्रापन्नी व इतरही कचऱ्याची केली होळी

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : चोरून लपून खर्रा व इतरही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करीत असलेल्यांवर अंकुश आणण्यासाठी सोमवारी सिरोंचा पोलिसांनी सकाळीच धाडसत्र मोहीम सुरू केली. शहरातील पानठेले, चहाटपºया, खाद्यपदार्थ विक्रीचे ठेले पोलिसांनी तपासले. विशेष म्हणजे संपूर्ण शहरात फिरताना इतरत्र पसरलेल्या खर्रा पन्नी व तंबाखूजन्य पदार्थांचा कचरा गोळा करून त्याची होळी करून परिसर स्वच्छ केला.१ फेब्रुवारी २०१९ पासून सिरोंचा शहरातील ७० पानठेलाधारकांनी खर्राविक्री बंद केली. यातील ६८ जणांनी पानठेलेच बंद केले तर दोन पानठेलाधारक केवळ पान विकतात. असे असले तरी चोरट्या मार्गाने चहा टपऱ्या, रस्त्यावरील उपहारगृहे व इतरही लहान मोठ्या दुकानांमध्ये खर्रा विक्री होत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अशा विक्रेत्यांवर कारवाई व्हावी तसेच ज्यांनी विक्री पूर्णत: बंद ठेवली आहे त्यांनी ती टिकवून ठेवावी, यासाठी सिरोंचा पोलिसांनी सहायक पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनात सोमवारी सकाळीच ८ वाजता धाडसत्र राबविले.यावेळी दोन पानठेल्यांची तपासणी पोलिसांनी केली. त्यासोबतच चहाटपरी, उपहारगृहे यांचीही तपासणी केली. यावेळी कोणताही मुद्देमाल पोलिसांना सापडला नाही. पण शहरात सर्वत्र खर्रा पन्नी व इतरही तंबाखूजन्य पदाथार्चा प्लॅस्टिक कचरा पसरलेला होता. हा सर्व कचरा पोलिसांनी गोळा करून त्याची मुख्य चौकात होळी केळी. यात त्यांना ऑटो चालक - मालक संघटना व शहरातील नागरिकांनी सहकार्य केले. जवळपास २० पोलीस कर्मचारी यात सहभागी झाले होते. पोलिसांच्या या धाडसत्रामुळे चोरून लपून खर्रा विकणाऱ्यांना धडकी भरली. विक्रेत्यांवर अंकुश ठेवण्यासाठी अशी धाडसत्रे सातत्याने राबविणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.विक्रेत्यांनीच गुळसडवे केले नष्टबामणी पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या जाफराबाद मध्ये दारू गाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुळाची आवक केली जात आहे. गत महिन्यात दोन वेळा पोलिसांनी धाड टाकून गुळाचा मोठा साठा जप्त केला आहे. दारू गाळण्यासाठी एकाने सडवा लावल्याची माहिती मुक्तिपथ चमुला दोनच दिवसांपूर्वी मिळाली. पण कार्यकर्ते येत असल्याचे समजताच या गाळणाºयाने सडवा स्वत:च नष्ट करून पळ काढला. त्यामुळे मुक्तिपथ चमू पोहोचल्यावर त्यांना केवळ रिकामे ड्राम व जमिनीवर सांडलेला सडवा दिसला.

टॅग्स :Policeपोलिस