शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

पोलिसांनी ५० जनावरे पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:17 IST

तेलंगणातील कत्तलखान्यात घेऊन जाणारी ५० जनावरे मुलचेरा पोलिसांनी बुधवारी पकडून कसायाच्या तावडीतून या जनावरांची सुटका केली.

ठळक मुद्देसात आरोपींना अटक, १२ फरार : कत्तलीसाठी नेणाºया जनावरांची मुक्तता

लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : तेलंगणातील कत्तलखान्यात घेऊन जाणारी ५० जनावरे मुलचेरा पोलिसांनी बुधवारी पकडून कसायाच्या तावडीतून या जनावरांची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून १२ आरोपी फरार आहेत.विशेष म्हणजे या कारवाईदरम्यान आरोपींकडून हल्ला करण्यात आल्याने एक पोलीस शिपाई जखमी झाला. छत्तीसगड राज्यातून मुलचेरा तालुक्यातील मोहुर्ली-श्रीनगर-कोठारी मार्गे तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी ५० जनावरे नेत असल्याची गुप्त माहिती मुलचेरा पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सदर ५० जनावरे बुधवारी पकडली.समर ऊर्फ टिल्लू मुखर्जी (२९), किरण कलाचंद दास (२८) रा. विवेकानंदपूर, मनमत विष्णूपद रॉय (३६) रा. श्रीनगर, अविनाश खितीश दास (४९) रा. श्रीनगर, उत्तम गणेश बिश्वास (२३), रणो नित्योनंद हिरा (२३) रा. पाखांजूर नं. २३, संजय मनीमोहन मंडल (३०) रा. पाखांजूर नं. २१ या सात आरोपींना अटक करून गुरूवारी चामोर्शीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या आरोपींना १६ आॅक्टोबरपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.१० आॅक्टोबर रोजी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक मिलींद पाठक यांच्या नेतृत्वात गोकुलदास मेश्राम, अरविंद हलदार, भाऊराव वनकर, रवींद्र आखाडे, सुखदेव लोणारकर, सखाराम सेडमाके, दादाजी रामटेके, सुभाष सहारे आदींनी सापळा रचून ४६ गाय व बैल तसेच चार म्हैस अशी एकूण ५० जनावरे पकडली. कसायाच्या तावडीतून या जनावरांची सुटका करून सदर जनावरांना कोठारी ग्रामपंचायतीच्या कोंडवाड्यात ठेवण्यात आले आहे.कारवाईदरम्यान आरोपींनी शासकीय कामात अडथळा निर्माण करून लाठ्या व दगडांचा मारा पोलिसांवर केला. त्यामुळे पोलीस हवालदार सुखदेव लोणारकर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी आरोपींविरोधात भादंविचे कलम ३०७, ३५३, ३३२, १४३, १४७, १४९ तसेच महाराष्टÑ प्राणी संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सर्व ५० जनावरांची किंमत ७० हजार रूपये आहे. यापूर्वीही सदर भागातून चोरट्या मार्गाने जनावरांची अवैध वाहतूक झाली होती.आरोपीत पोलीसही?विशेष म्हणजे या प्रकरणातील फरार झालेल्या १२ आरोपींमध्ये एका दैनिकाच्या वार्ताहराचा समावेश आहे. तसेच या प्रकरणात एका वरिष्ठ पोलीस कर्मचाºयाचाही समावेश असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. एवढेच नाही तर एका राजकीय पक्षाशी संबंधित कार्यकर्तेही आरोपींमध्ये आहेत.