प्लास्टिक कोटेड वीज केबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 05:00 AM2020-05-21T05:00:00+5:302020-05-21T05:00:48+5:30

शहरातील काही नागरिकांनी अतिक्रमण करून रस्त्यावर घरे बांधली आहेत. तसेच काही ठिकाणी वळणाचे रस्ते आहेत. त्यामुळे वीज खांबाच्या तारा घरांना स्पर्श करतात. वादळ झाल्यानंतर किंवा एखाद्या व्यक्तीचा चुकीने स्पर्श होऊन अपघात होण्याची शक्यता राहते. त्यामुळे वीज विभागाने अशा ठिकाणी प्लास्टिक कोटेड वीज केबल टाकले आहेत.

Plastic coated power cable | प्लास्टिक कोटेड वीज केबल

प्लास्टिक कोटेड वीज केबल

Next
ठळक मुद्देअपघात व चोरी थांबणार : गडचिरोली, देसाईगंजात उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत गडचिरोली शहरात ७.५ किमी तर देसाईगंज शहरात ६ किमीचे प्लास्टिक कोटेड केबल खांबावरून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे विजेचा धक्का लागण्यापासून संरक्षण होण्यास मदत होणार आहे. तसेच तारांवर आकडे टाकून वीज चोरी करण्याचे प्रमाणही कमी होणार आहे.
शहरातील काही नागरिकांनी अतिक्रमण करून रस्त्यावर घरे बांधली आहेत. तसेच काही ठिकाणी वळणाचे रस्ते आहेत. त्यामुळे वीज खांबाच्या तारा घरांना स्पर्श करतात. वादळ झाल्यानंतर किंवा एखाद्या व्यक्तीचा चुकीने स्पर्श होऊन अपघात होण्याची शक्यता राहते. त्यामुळे वीज विभागाने अशा ठिकाणी प्लास्टिक कोटेड वीज केबल टाकले आहेत. गडचिरोली शहरात ७.५ किमी व देसाईगंज शहरात ६ किमी अंतराचे केबल टाकण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, अडचणींच्या ठिकाणीच सदर केबलचा उपयोग करण्यात आला आहे. प्लास्टिक कोटेड केबलमुळे आकडा टाकून वीज चोरीवरही आळा घालण्यास मदत होत आहे.

भूमिगत वीजवाहिनी
एकात्मिक ऊर्जा विकास कार्यक्रमांतर्गत शहरी भागात भूमिगत वीज केबल टाकण्याची योजना सुध्दा राबविली जाते. या योजनेंतर्गत गडचिरोली शहरात ११.५ किमी व देसाईगंज शहरात १.६ किमी अंतरावर भूमिगत वीज केबल टाकण्यात आले आहेत. तसेच गडचिरोली शहरात १०० केव्हीचे १३ नवीन रोहित्र व २०० केव्हीचे ११ नवीन रोहित्र बसविले आहेत. देसाईगंज शहरात १०० केव्हीचे ९ तर २०० केव्हीचे ५ रोहित्र बसविले आहेत. गडचिरोली शहरातील २०० केव्हीच्या १०, देसाईगंज शहरातील १०० केव्हीच्या सात, २०० केव्हीच्या १० रोहित्रांची क्षमतावाढ केली आहे.

Web Title: Plastic coated power cable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज