शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

ढिगारे साचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:28 IST

देसाईगंज : नगरपालिकेच्या क्षेत्रात व्यावसायिक व नागरिक मोठ्या प्रमाणावर काळ्या व पांढऱ्या प्लास्टिक पन्न्यांचा वापर करतात. अनेकजण दुकान बंद ...

देसाईगंज : नगरपालिकेच्या क्षेत्रात व्यावसायिक व नागरिक मोठ्या प्रमाणावर काळ्या व पांढऱ्या प्लास्टिक पन्न्यांचा वापर करतात. अनेकजण दुकान बंद झाल्यानंतर या पन्न्या व प्लास्टिक कागद रस्त्यावर व नाल्यांमध्ये फेकतात. व्यापाऱ्यांमध्ये जनजागृतीचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने कारवाई करावी.

खासगी प्रवासी वाहनांचा धुमाकूळ

देसाईगंज : शासनाच्या नियमानुसार एस. टी.च्या बस थांब्यापासून २०० मीटर अंतरावर खासगी वाहनांना उभे ठेवून प्रवासी भरण्यास बंदी असली, तरी देसाईगंज येथे या नियमाचे सर्रासपणे उल्लंघन हाेत आहे. येथे सर्रास खासगी प्रवासी वाहनांचा धुमाकूळ सुरू असतानाही त्यांच्यावर कारवाई होत नाही.

बँकांअभावी ग्रामीण नागरिकांची अडचण

धानोरा : ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना आर्थिक व्यवहार करताना अडचण निर्माण होत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना ग्रामीण भागात शाखा स्थापन करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी होत आहे.

देलाेडा-सूर्यडाेंगरी मार्ग उखडला

वडधा : देलाेडा- सूर्यडाेंगरी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून मार्गाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

कार्यालये पडली ओस

गडचिराेली : येथील पंचायत समिती, शिक्षण विभागाच्या कार्यालयात अत्यल्प कर्मचारी दिसून येत आहेत. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालयातही कर्मचाऱ्यांची वानवा आहे. पाच दिवसांचा आठवडा असल्याने अनेक कर्मचारी शुक्रवारीच कार्यालय साेडतात. त्यानंतर साेमवारीच कार्यालयात हजर हाेतात व ते सुद्धा उशिरा येतात.

कोडसेपल्लीत अनेक समस्या वाढल्या

अहेरी : परिसरातील दुर्गम भागात वसलेल्या कोडसेपल्ली येथे अनेक समस्यांची भरमार आहे. गावात नाल्यांचा अभाव असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचण येत आहे. परिसरात जागोजागी सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. गावात मूलभूत साेयी-सुविधा पुरवून रस्ते व नाल्यांचे बांधकाम करावे, अशी मागणी होत आहे.

वनपट्ट्यांसंदर्भात जाचक अटी रद्द करा

गडचिरोली : शासनाने वनहक्क अधिनियम २००६ अन्वये वन जमिनींचे पट्टे देण्याचे धोरण अंमलात आणले आहे. मात्र, कागदपत्रांच्या अटीमुळे अद्यापही जिल्ह्यातील अनेक गरजू व गरीब नागरिक वनहक्काच्या पट्ट्यापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वनहक्क पट्टे निकाली काढावे, अशी मागणी होत आहे.

मोबाईल सेवा ठरत आहे कुचकामी

कुरखेडा : तालुक्यातील सोनसरी, उराडी परिसरात बीएसएनएलची भ्रमणध्वनी व दूरध्वनी सेवा पूर्णत: ठप्प आहे. बीएसएनएलच्या भोंगळ कारभारामुळे शिक्षकांकडून होणारे ऑनलाईन काम प्रभावित झाले आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. या भागातील ग्राहक माेबाईल इंटरनेटचा वापर करतात. पण सेवा मिळत नसल्याने त्यांचा हिरमोड होतो.

माेकाट जनावरे वाढली

जिमलगट्टा : गावातील मोकाट जनावरे रस्त्यावर बसून राहतात. ग्रामस्थांना व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याच मार्गावर गावातील मोकाट जनावरे बसून राहत असल्यामुळे तो खराब झाला आहे. जनावरे रस्त्यावर बसून राहत असल्याने अस्वच्छता पसरत आहे.

गंजलेले खांब धाेकादायक

सिरोंचा : येथील अनेक प्रभागांतील रस्त्यालगत असलेले वीजखांब गंजले आहेत. हे खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब बदलण्याची मागणी होत आहे. यापूर्वी अनेकदा हे खांब बदलण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

ग्रामीण भागात पेट्रोलची अवैध विक्री

आष्टी : जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात जादा दराने पेट्रोलची विक्री गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. खेड्यातील काही किराणा दुकानदार विक्रीसाठी शहरातील पेट्रोल पंपावरून ठोक स्वरूपात पेट्रोल नेवून ठेवतात. त्यानंतर गरजू दुचाकीस्वारांकडून लीटरमागे २० ते ३० रुपये जादा घेतात. दुसरा पर्याय नसल्यामुळे लोक अधिकचे पैसे मोजतात.

बाजार लाईनमध्ये वाहन बंदीकडे दुर्लक्ष

गडचिरोली : शहरातील पटेल सायकल स्टोअर्स ते आठवडा बाजार या मार्गावर चारचाकी वाहनांना तसेच अवजड वाहनांना बंदी घालण्यात यावी, अशी मागणी होत आहे. परिसरातील त्रिमूर्ती चौकात बाजारपेठ असल्याने येथे चारचाकी व दुचाकी वाहनांची प्रचंड वर्दळ असते. या परिसरातून एकतर्फी वाहतूक सुरु करावी, अशी मागणी होत आहे.

मातीचे बंधारे बांधून सिंचन सुविधा द्या

आलापल्ली : वन विभागातर्फे दोन वर्षांपूर्वी जंगलातील सहा स्थानांवर मातीचे बांध बांधण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता; परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रस्ताव अजूनही धूळखात पडला आहे. मातीचे बंधारे झाल्यास सिंचनाची सोय होईल.

राजोलीचा पूल अर्धवट

धानोरा : तालुक्यातील राजोली गावाजवळच्या कठाणी नदीवर पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल दोन वर्षांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे रपट्यासह वाहून गेला. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात या गावातील विद्यार्थी व ग्रामस्थांना पुलाअभावी नवरगावमार्गे अधिकचे १५ किलोमीटरचे अंतर कापावे लागते.