लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जुनी पेन्शनच्या मागणीसाठी देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांनी संसदेवर धडक दिली. या आंदोलनात गडचिरोली जिल्ह्यातील १०० पेक्षा जास्त कर्मचारी सहभागी झाले होते.शासकीय कर्मचाऱ्यांना संविधानाच्या कलमान्वये सुरू असलेली १९६२ व १९८४ ची पेन्शन योजना २००४ मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने बंद केली. केंद्रीय कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २००४ पासून तर महाराष्ट्रातल कर्मचाऱ्यांना १ नोव्हेंबर २००५ पासून पेंशन बंद झाली. या कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदायी पेंशन योजना लागू करण्यात आली. इतरही राज्यांनी अंशदायी पेंशन योजना लागू केली.या योजनेला काही दिवस विरोध झाला नाही. त्यामुळे सदर योजना शासनाने पुढे रेटली. मात्र मागील चार वर्षांपासून जुनी पेंशन योजनेची मागणी होत आहे. महाराष्ट्रात जुनी पेंशन हक्क संघटना स्थापन करण्यात आली असून या संघटनेच्या माध्यमातून लढा दिला जात आहे. काही दिवसांपूर्वीच शिवनेरी ते मंत्रालयापर्यंत पेंशन दिंडी काढण्यात आली होती.या पेंशन दिंडीत हजारो कर्मचारी सहभागी झाले होते. त्यानंतर शासनाने परिभाषित पेंशन योजना लागू असलेल्यांसाठी काही सवलती जाहीर केल्या. मात्र याने कर्मचाºयांचे समाधान झाले नाही. देशभरातील १८ राज्यातील कर्मचाºयांनी दिल्लीवर २६ नोव्होंबर मोर्चा काढला. या मोर्चात राज्यभरातील हजारो कर्मचारी सहभागी झाले तर एकट्या गडचिरोली जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत.आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांमध्ये प्रामुख्याने जुनी पेंशन हक्क संघटनेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष गुरूदेव नवघडे, जिल्हा उपाध्यक्ष अंकुश मैलारे, सरचिटणीस बापू मुनघाटे, देवेंद्र लांजेवार, उमाजी गोवर्धन, मनीष कावळे, विठ्ठल होंडे, गणेश आखाडे, धानोरा तालुकाध्यक्ष दीपक सुरपाम, मुलचेरा तालुकाध्यक्ष अशोक बोरकुटे, रमेश रामटेके, मंगेश दडमल, प्रवीण धाडसे, विश्वनाथ सोनटक्के, संजय निकोसे, विनोद धारणे, महेश धनगुण, राहुल पेंदोर, रवी शेरेकर, सचिन भुरकुंडे, शैलेश खापरे, अशोक वाढई आदींचा समावेश आहे.
पेन्शनसाठी दिल्लीवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 22:32 IST
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जुनी पेन्शनच्या मागणीसाठी देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांनी संसदेवर धडक दिली. या आंदोलनात गडचिरोली जिल्ह्यातील १०० ...
पेन्शनसाठी दिल्लीवर धडक
ठळक मुद्देजुनी पेन्शन लागू करा : १०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा सहभाग