शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

२५० वाहनांवर दंडाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 5:00 AM

अत्यावश्यक कामासाठी नागरिकांना बाहेर पडता येते, असे असतानाही चामोर्शी शहरातील व परिसरातील काही युवक व नागरिक अनावश्यक कामासाठी दुचाकीवर फिरत असल्याचे दिसून येते. अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकांना आळा बसावा, यासाठी पोलिसांनी अनेकदा युवकांना दंडुकेशाहीचा वापर केला. मात्र याला नागरिक मानण्यास फारसे तयार नाही. त्यामुळे चामोर्शी पोलीस ठाण्याच्या वाहतूक पोलिसांनी संचारबंदी तोडणाऱ्या वाहनधारकांविरोधात कठोर पावले उचलून त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू केली आहे.

ठळक मुद्देघराबाहेर पडण्यास मज्जाव : चामोर्शी पोलिसांनी वसूल केला ६२ हजाराहून अधिक दंड

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या २५० वाहनधारकांवर चामोर्शी पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून ६२ हजार ८०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईमुळे संचारबंदीचे उल्लंघन करणारे नागरिक धास्तावले आहेत.नागरिक एकमेकांच्या संपर्कात आल्याने कोरोना विषाणूचा प्रसार होत असतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे कोणत्याही नागरिकाला विनाकारण घराबाहेर पडण्याची मुभा नाही. अत्यावश्यक कामासाठी नागरिकांना बाहेर पडता येते, असे असतानाही चामोर्शी शहरातील व परिसरातील काही युवक व नागरिक अनावश्यक कामासाठी दुचाकीवर फिरत असल्याचे दिसून येते. अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकांना आळा बसावा, यासाठी पोलिसांनी अनेकदा युवकांना दंडुकेशाहीचा वापर केला. मात्र याला नागरिक मानण्यास फारसे तयार नाही. त्यामुळे चामोर्शी पोलीस ठाण्याच्या वाहतूक पोलिसांनी संचारबंदी तोडणाऱ्या वाहनधारकांविरोधात कठोर पावले उचलून त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू केली आहे.चामोर्शी-आष्टी मार्ग, बसस्थानक परिसर व इतर प्रमुख मार्गावर पाळत ठेवून वाहतूक पोलिसांनी २५० वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली. चामोर्शीचे पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनात वाहतूक पोलीस व ठाण्यातील कर्मचारी सुरक्षा, व्यवस्था सांभाळण्याचे काम करीत आहेत.२०० वर नागरिकांना दिली मदतचामोर्शी पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २०० पेक्षा अधिक गरीब, गरजू नागरिकांना जीवनाश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. तांदूळ, डाळ, तिखट, मीठ, हळद, तेल पॉकेट आदी वस्तूचे वाटप करण्यात आले. सदर उपक्रम आणखी काही दिवस सुरू राहणार आहे. गरजू व्यक्तींनी पोलीस ठाण्यात येऊन साहित्य घेऊन जावे, असे आवाहन ध्वनि क्षेपकाच्या माध्यमातून पोलीस ठाण्यातर्फे येत आहे. याशिवाय मास्क, हॅन्डवॉश, परराज्यातून येणाºया ट्रक चालकांना केळीचे वाटप करण्यात येत आहे. होम क्वारंटाईनचे शिक्के मारलेल्यांनी घराबाहेर पडू नये, तसे झाल्यास गुन्हे दाखल करू, संचारबंदीबाबत नागरिकांनी जागृत राहावे, असे आवाहन ठाणेदार बोरकर यांनी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या