शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

पूर्व विदर्भाच्या जंगलातून मोराचा पिसारा झाला लुप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 15:05 IST

Gadchiroli : शिकाऱ्यांचा फास जंगल तोडल्याने निवारा झाला नष्ट

प्रदीप बोडणे लोकमत न्यूज नेटवर्क वैरागड : पावसाळ्यापूर्वी मोराचा विणीचा काळ असतो. नंतर त्याचा पिसारा झडून जातो. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत जंगलात मोरपीस हमखास सापडतात. ग्रामीण भागात शेतकरी दिवाळीच्या सणाला गोवर्धन पूजेला गाय-म्हशी सजविण्यासाठी मोराच्या पिसांचा वापर करतात. पण, हे मोरपीस आता पूर्व विभागाच्या जंगलात सापडत नाही. कारण सुंदर दिसणाऱ्या या पक्ष्याची मोठ्या प्रमाणात शिकार झाली आणि पूर्व विदर्भाच्या जंगलातून मोराची किंचाळी लुप्त झाली आहे. 

निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारा सुंदर पक्षी म्हणजे मोर, याच्या आकर्षक रंगामुळे या पक्ष्याला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता दिली आहे. पूर्व विदर्भातील झाडीच्या जंगलात या पक्ष्यांची संख्या मोठी होती. कृमी-कीटक, गवत, धान्य हे त्याचे अन्न. झुडपी जंगलात मोरांचा वावर होता. वर्षभर जंगलात मिळेल त्या ठिकाणी आसरा करून राहणारा मोर विणीच्या काळात मात्र नर आणि मादी एकत्र येतात. घरटी बांधतात आणि पिलाला जन्म देतात. 

विणीचा काळ ओळखून शिकारीचे अघोरी कृत्य करणारे लोक त्याचे घरटे हेरून घरट्यात एक विशिष्ट चिकट पदार्थ टाकून ठेवतात. त्यात मोर अडकतो. अशा पद्धतीने शिकारी झाल्या आणि मोर नष्ट झाले. 

वडसा वनविभाग अंतर्गत येणाऱ्या वैरागड, वासाडा, रामाडा, इंजेवारी, शिरपूर, आरमोरी, पळसगाव, भगवानपूर, सावलखेडा, कराडीचे जंगल मोरांच्या निवासाचे जंगल म्हणून ओळखले जायचे. जंगलात वावर असणारे आणि रानवाटांना जाणाऱ्या लोकांना मोर हमखास दृष्टीत पडायचे. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत जंगलात गुरे चारायला नेणारे गुराखी हमखास पाच-दहा मोरपिसे जंगलातून घेऊन घरी परतायचे. त्याच्या निवान्यासाठी जंगल अनुकूल असायचे, जंगल झपाट्याने नष्ट झाले आणि निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारा मोर नष्ट झाला. तृणभक्षी प्राण्यांची संख्या कमी झाली असताना मांसभक्षी प्राण्यांची संख्या वाढली आहे. परिणामी वाघ, बिबट्यांचे माणवावर हल्ले वाढले आहेत. 

एफडीसीएमने केले जंगल नष्ट जंगलाची मोठ्या प्रमाणात हानी केली ती वन विकास महामंडळाने. एकत्रीकरणाच्या नावावर जंगलाची विल्हेवाट लावली आणि उरले-सुरले जंगल लोकांनी तोडून नेले. त्यामुळे तृणभक्षी प्राण्यांचा गवताळ झुडपी जंगलाचा निवारा नष्ट झाल्याने हरीण, ससा, मोर, लांडोर हे तृणभक्षी प्राणी, पक्षी शिकाऱ्यांच्या हाती गवसले. वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर या संस्थेने नुकताच प्रकाशित केलेल्या अहवालाचा विचार केला तर सन १९७२ पासून आतापर्यंत तृणभक्षी प्राण्यांच्या संख्येत तब्बल ७० टक्क्यांनी घट झाली. याचे मुख्य कारण म्हणजे जंगलांना लागणारे वनवे, जंगलाचे कमी होणारे प्रमाण, जंगलातील जैवविविधता नष्ट होणे यांचा परिणाम आहे.

"जंगल नष्ट होत असल्यामुळे गडचिरोलीच्या जंगलातील मोर जवळपास नष्टच झाले आहेत. पक्ष्यांमध्ये सर्वात सुंदर असलेला हा पक्षी आहे. उंच असल्याने तो जास्त उडू शकत नाही. त्यामुळे त्याची शिकार सहज करता येते."- फाल्गुन मेहेर, वन्यजीव प्रेमी

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीwildlifeवन्यजीव