शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत अंशत: लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:36 IST

सोमवार ते शुक्रवार यादरम्यान सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीत जमावबंदी आदेश लागू राहील. यात पाच पेक्षा अधिक ...

सोमवार ते शुक्रवार यादरम्यान सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीत जमावबंदी आदेश लागू राहील. यात पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास मनाई असेल. तसेच ८ ते सकाळी ७ या वेळेत कोणत्याही सबळ/अतितातडीच्या कारणाशिवाय किंवा परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरण्यावर बंदी राहणार आहे. यात अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत व्यक्तींना ही बंधने लागू राहणार नाही.

सोमवार ते शुक्रवारी सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीत घराबाहेर पडताना नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी नाकातोंडावर मास्क लावणे, वेळोवेळी हात धुणे, सामाजिक अंतर राखणे इत्यादी सर्व बाबींचे पालन करणे अनिवार्य राहणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, बाजारपेठा पूर्णपणे बंद राहतील.

सार्वजनिक वाहतुकीमध्ये राज्य शासनाने दिलेले आदेशाप्रमाणे ऑटो रिक्षा चालक आणि दोन प्रवासी, टॅक्सी (चार चाकी) चालक आणि ५० टक्के वाहन क्षमतेने प्रवास करण्याची परवानगी असेल.

बस वाहतूक सुरू

एसटी किंवा खासगी बसेसमधून प्रवास करताना आसन क्षमतेनुसार बसण्याची परवानगी राहील, पण कोणालाही उभे राहून प्रवास करण्यास मज्जाव असेल. सार्वजनिक वाहतुकीत, चारचाकी टॅक्सीमध्ये जर एखाद्या व्यक्तीने मास्क घातलेला नसेल तर त्या व्यक्तीला आणि टॅक्सी चालकाला प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारला जाईल. सर्व सार्वजनिक वाहतुकीमध्ये कार्यरत चालक आणि इतर कर्मचारी हे लोकांच्या संपर्कात येत असतात. त्यामुळे शासनाच्या निकषानुसार त्यांनी लवकरात लवकर लसीकरण करावे आणि पूर्णपणे लसीकरण होईपर्यंत १५ दिवसापर्यंत वैध असलेले नकारात्मक कोरोना निकाल प्रमाणपत्र सोबत ठेवणे अनिवार्य आहे. हा नियम १० एप्रिलपासून लागू होईल.

(बॉक्स)

अत्यावश्यक सेवेत या बाबींचा समावेश

रूग्णालये, रूग्ण तपासणी केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालय, औषध निर्माण कार्यशाळा, औषधी विक्री केंद्र (मेडिकल स्टोअर्स) आणि वैद्यकीय क्षेत्राशी निगडित आस्थापना आणि उपक्रम हे अत्यावश्यक सेवेत मोडते. किराणा दुकान, भाजी विक्रीची दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई विक्रीची दुकाने, खाद्यपदार्थ विक्री केंद्र, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत रेल्वे, टॅक्सी, ॲाटोरिक्षा , सार्वजनिक वाहतूक बसेस, स्थानिक प्रशासनाद्वारा करावयाची मान्सूनपूर्व कामे, स्थानिक संस्थांव्दारा पार पाडल्या जाणारी सर्व सार्वजनिक स्वरूपाची कामे, मालवाहतूक, शेती क्षेत्राशी निगडित सेवा, ई-कॉमर्स, प्रसार माध्यमे, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने अत्यावश्यक म्हणून ठरविलेल्या सेवा/बाबी आदींचा यात समावेश असून त्यांना अंशत: लॉकडाऊनमध्ये सूट राहणार आहे.

कार्यालयात ५० टक्के उपस्थिती

सहकारी संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व खाजगी बँका, विद्युत पुरवठा कंपन्या, टेलिकॉम सेवा पुरवठादार, विमा, मेडिक्लेम कंपनी, औषधी उत्पादन/वितरण व्यवस्थापनासाठी असलेल्या कंपनीची कार्यालये आदी सुरू राहतील. शासकीय कार्यालये ५० टक्के उपस्थिती क्षमतेने चालू राहातील. तथापि जी कार्यालये कोविड-१९ साथरोग या कामकाजासंबंधित असतील ती १०० टक्के उपस्थितीत विभागप्रमुखांच्या निर्णयान्वये सुरु राहतील.

रेस्टाॅरंट, हॉटेल्समध्ये केवळ पार्सल सेवा

सर्व प्रकारचे रेस्टाॅरंट बंद असतील. खाद्यपदार्थांची ऑर्डर, पार्सल आणि घरपोच सेवा सुरु ठेवता येईल. कोणत्याही हॉटेल/रेस्टॉरंट मध्ये ऑर्डरकरिता भेट देता येणार नाही. हॉटेलमधील उपलब्ध जेवणाची व्यवस्था केवळ सदर हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या व्यक्तींकरिता असेल.

मंदिरे पुन्हा बंद

धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे बंद राहतील. प्रार्थना स्थळांमध्ये सेवा देणाऱ्या व्यक्तींना मंदिराच्या आत पूजा-अर्चना करण्यास परवानगी असेल, परंतु कोणत्याही बाहेरील व्यक्तीला प्रवेश देण्यात येऊ नये. अशा स्थळी काम करणाऱ्या सर्व व्यक्तींनी लसीकरण करून घ्यावे, जेणेकरुन असे स्थळ पुन्हा खुले करण्यासाठी सोपे जाईल, असे आदेशात म्हटले आहे.

वृत्तपत्रांचे वितरण सुरू

वर्तमानपत्रांची छपाई व वितरण सर्व दिवस करता येईल. घरपोच वृत्तपत्र पोहोचवण्यासाठी सर्व दिवशी सकाळी ७ ते रात्री ८ वाजतापर्यंत परवानगी असेल. यामध्ये संलग्न असलेल्या सर्वांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार त्वरित लसीकरण करून घ्यावे. होम डिलीव्हरी करणाऱ्या व्यक्तींनी कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे. हा आदेश १० एप्रिलपासून अंमलात येईल.

शाळा व महाविद्यालये बंद

जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद राहतील. १० वी आणि १२ वीच्या परीक्षेस पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना यातून सूट देण्यात येत आहे. परीक्षा घेणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घ्यावे किंवा त्यांनी कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे. सर्व प्रकारचे खाजगी शिकवणी वर्ग बंद राहतील.