शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

गडचिरोलीत दीड कोटी रुपयांचा धान घोटाळा ! शेतकऱ्यांचे चुकारे अजूनही प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 15:00 IST

५० लाख रुपयांचे धान चुकारे अहेरी कार्यालयांतर्गत प्रलंबित : १३७ कोटी रुपयांचे धानाचे चुकारे शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमार्फत जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ८० केंद्रांवरून धानाची खरेदी केली जाते. मात्र हंगाम संपला तरी २०० वर शेतकऱ्यांचे जवळपास दीड कोटी रुपयांचे चुकारे प्रलंबित आहेत. परिणामी, धान उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

दरवर्षी खरीप व रब्बी हंगामात आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने धानाची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. खरीप हंगामात सदर केंद्रांवर डिसेंबरपासून धान खरेदी सुरू झाली. ३१ मार्चपर्यंत बहुतांश केंद्रांवर धानाची आवक झाली. या धानाचा काटा करण्यात आला. सुरुवातीला सादर केलेल्या एक ते दोन हुंडींचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. परंतु अनेक शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे त्यांच्या खात्यात जमा न झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या घरचे लग्न, कार्यक्रम, घर बांधणे, मजुरांचे देणे, सावकाराचे कर्ज, बँकेचे कर्ज थकीत पडले आहे. आधीच शेतकऱ्यांना धानाचा योग्य मोबदला मिळत नाही. धानावर अनेक रोगांचे आक्रमण अशा परिस्थितीत निसर्गाशी झगडून न खचता शेतकरी धान पिकवतो. आपले आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याकरिता ते आपले धान आधारभूत खरेदी केंद्रावर विक्री केले.

असे आहेत धानाचे चुकारे थकीत..गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत ५० केंद्रांवरून धानाची खरेदी झाली. यापैकी १७० कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात अदा करण्यात आले. अजूनही १०० शेतकऱ्यांचे ५४ लाख ७हजार ५३० रुपयांचे चुकारे प्रलंबित आहेत. ज्या शेतकऱ्यांचा पीएफ एमएस आयडी तयार झालेला नाही किंवा लॉट पडलेला नाही किंवा खात्यामध्ये त्रुटी आहे, अशा शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही. २३५१.१० क्विंटल धानाचे ५४ लाख ७हजार ५३० रुपये बाकी आहे.

 

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीCropपीकPaddyभातfarmingशेतीFarmerशेतकरी