शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

२ लाख २२ हजार हेक्टरवर धान लागवडीचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 10:22 PM

जिल्ह्यात सर्वाधिक धान पिकाची लागवड केली जाते. २०१८-१९ च्या हंगामात १ लाख ८२ हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड झाली होती. २०१९-२० या हंगामात २ लाख २२ हजार हेक्टरवर धानाच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कृषी विभागाने आढावा बैठकीत दिली.

ठळक मुद्देखरीप हंगामाच आढावा : शेतकऱ्यांना सर्व सुविधा पुरविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात सर्वाधिक धान पिकाची लागवड केली जाते. २०१८-१९ च्या हंगामात १ लाख ८२ हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड झाली होती. २०१९-२० या हंगामात २ लाख २२ हजार हेक्टरवर धानाच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कृषी विभागाने आढावा बैठकीत दिली. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सभेत जिल्हाधिकाऱ्यांनी विविध योजनांचा आढावा घेतला. तसेच येत्या खरीप हंगामाचे योग्य नियोजन करावे, शेतकऱ्यांना कोणतीही अडचण यासाठी कृषी विभागाने विशेष खबरदारी घ्यावी, असे निर्देश दिले.या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, प्रकल्प संचालक (आत्मा) प्रकाश पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, उपसंचालक धनश्री जाधव, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, लीड बँकेचे व्यवस्थापक प्रमोद भोसले प्रामुख्याने उपस्थित होते.प्रधानमंत्री पीक विमा योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी कृषी विभागाने अधिक प्रयत्न करावेत, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, याबाबत जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत माहिती पोहचेल या दृष्टीने प्रयत्न करावे. त्यासाठी पत्रके, कलापथक आदींचा जनजागृतीसाठी वापर करावा, असे निर्देश दिले. कृषी पीक कजार्बाबत सर्व बँकांनी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. अधिकाधिक जणांना पीक कर्ज घेणे शक्य व्हावे, यासाठी प्रयत्न करा, आत्मा प्रयोग म्हणून करण्यात आलेली धानाची मल्चींग पध्दती तसेच धान व मत्स्यशेतीचा प्रयोग जिल्ह्यात सर्वत्र वाढवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बैठकीत दिल्या. या बैठकीत मागील खरीप हंगामातील स्थितीची माहिती देऊन यंदाच्या हंगामातील उपाययोजनांची माहिती देण्यात आली.जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान १५०२.३८ मिलीमीटर इतके आहे. गेल्या खरीप हंगामात केवळ १३५५.३१ अर्थात ९५.९३ टक्के इतका पाऊस झाला होता. सर्वाधिक १३५.१० टक्के पाऊस सिरोंचा तालुक्यात, तर सर्वात कमी ७४.७८ टक्के पाऊस कोरची तालुक्यात पडला. कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले चारसूत्री धान लागवड तंत्रज्ञान तसेच ह्यश्रीह्ण पध्दतीने लागवड याचा अधिक वापर व्हावा, यासाठी प्रचार करण्यात येत आहे. या पध्दतीने लागवड केल्यास उत्पादन ५५ टक्के अधिक मिळते.१४ हजार ६०० हेक्टरवर कापूस लागवड होणारजिल्ह्यात चामोर्शी, अहेरी आणि सिरोंचा या तीन तालुक्यांमध्ये साधारणपणे सोयाबीनची लागवड होते. याचे एकूण क्षेत्र ५६४६ हेक्टर असले तरी गेल्या खरीप हंगामात केवळ ७ टक्के अर्थात ३९३ हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. जिल्हयात सोयाबीनचे क्षेत्र घटत असून कापसाच्या लागवडीचे प्रमाण वेगाने वाढत आहे. जिल्हयातील कपाशीचे एकूण क्षेत्र ४४५९ हेक्टर असले तरी गेल्या खरीप हंगामात १४००० हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली. हे क्षेत्र ९५४१ हजार हेक्टरने वाढलेले आहे. यामुळे २०१९-२० च्या खरीप हंगामात १४ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर कपाशीच्या लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.५८ शेतकऱ्यांना अपघात विमा योजनेचा लाभशेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत दोन लाख रुपयाचे विमा संरक्षण प्राप्त आहे. २०१५-१६ च्या खरीप हंगामापासून ही योजना शासनाने सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत १५१ प्रस्ताव प्राप्त झाले व हे सर्व प्रस्ताव विमा कंपनीकडे सादर करण्यात आले. ५८ मंजूर प्रस्तावापोटी शेतकऱ्यांच्या वारसांना विमा रक्कम देण्यात आली आहे. विमा कंपनीने ३३ प्रस्ताव नामंजूर केले तर २७ प्रस्ताव प्रलंबित आहेत. वारसांकडे प्रलंबित प्रस्तावांची संख्या ३३ आहे.२६ हजार क्विंटल बियाण्यांची गरज२०१९-२० च्या खरीप हंगामात २ लाख २२ हजार हेक्टर क्षेत्रावर धान लागवडीचे नियोजन आहे. यासाठी एकूण २६ हजार ७४० क्विंटल बियाणे लागणार आहे. यापैकी १५ हजार क्विंटल बियाणे महाबीजकडून प्राप्त होणार आहे. तर ११ हजार ७४० क्विंटल बियाणे खासगी वापरण्यात येईल, असे नियोजन करण्यात आले आहे.सोयाबीन ३०० क्टिंवल, तूर ३५० क्विंटल, बी.टी. कापूस १९७ क्विंटल, मका १४४ क्विंटल, उडीद ३ क्विंटल, तीळ एक क्विंटल या प्रमाणे एकूण २७ हजार ७३२ क्विंटल बियाणे या हंगामात लागणार आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीagricultureशेती