शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

सहा हजार हेक्टर क्षेत्रावर धान राेवणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:26 IST

यावर्षीच्या खरीप हंगामात सुमारे एक लाख ६८ हजार ४२० हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड केली जाणार आहे. धान राेवणी ...

यावर्षीच्या खरीप हंगामात सुमारे एक लाख ६८ हजार ४२० हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड केली जाणार आहे. धान राेवणी करण्यासाठी ११ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पऱ्हे टाकण्यात आले आहे. धान राेवणीच्या कामाला सुरुवात करण्यासाठी माेठ्या पावसाची गरज भासते. मात्र अजूनही माेठा पाऊस झाला नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे शेत सखल भागात तसेच ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे अशांनीच राेवणीला सुरुवात केली आहे. त्यामुळेच फक्त सहा हजार हेक्टर क्षेत्रावर धानाच्या राेवणीची कामे आटाेपली आहेत.

बाॅक्स

१५ हजार ७९१ हेक्टरवर आवत्या

धान राेवणीचा खर्च वाचविण्यासाठी काही शेतकरी आवत्या पद्धतीने धानाची राेवणी करतात. यावर्षी सुमारे १५ हजार ७९१ हेक्टर क्षेत्रावर आवत्या पद्धतीने धानाची लागवड करण्यात आली आहे. आवत्याबराेबरच काही शेतकऱ्यांनी यावर्षीपासून धानाच्या पेरणीला सुरुवात केली आहे. गडचिराेली तालुक्यात ३ हजार २६९, कुरखेडा ४७६, आरमाेरी ४ हजार १०४, चामाेर्शी ५५३, धानाेरा ३ हजार ८९, काेरची १ हजार, देसाईगंज १ हजार २१७, मुलचेरा १५९, भामरागड ३९८ हेक्टर क्षेत्रावर आवत्याची लागवड करण्यात आली आहे.

बाॅक्स

सिराेंचा तालुक्यात आता पऱ्हे भरण्यास सुरुवात

सिराेंचा तालुक्यात यावर्षी उशिरा पाऊस झाला. आता शेतकरी पऱ्हे टाकत आहेत. त्यामुळे धान राेवणीच्या कामाला सुरुवात हाेण्यास पुन्हा १५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या तालुक्यात कापसाचे माेठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकरी कापसाच्या लागवाडीतच व्यस्त असल्याचे दिसून येतात. कापसाची लागवड झाल्यानंतर शेतकरी धान पिकाकडे वळते.

बाॅक्स

तालुकानिहाय धानाचे क्षेत्र व राेवणे

तालुका क्षेत्र राेवणे

गडचिराेली १८,८२५ २१२६

कुरखेडा १५,६८० ४३४

आरमाेरी १८,८७३ १४८२

चामाेर्शी २७,००० ३८५

सिराेंचा ७७०४ ००

अहेरी ११,५१० ००

एटापल्ली १३,८०५ २

धानाेरा १९,८०४ ५२

काेरची १०,५१९ १३७

देसाईगंज ११,००४ १००२

मुलचेरा ६०५३ १४५

भामरागड ७६४० ५

एकूण १,६८,४२० ९९१०