पावसाने धान चिंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:19 AM2018-12-11T00:19:22+5:302018-12-11T00:20:02+5:30

जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून ढगाळी वातावरण कायम असून सोमवारी पहाटे व सायंकाळच्या सुमारास जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस बरसल्याने रबी पिकांसह धान पुंजन्यांचे नुकसान झाले.

Paddy chimba by rain | पावसाने धान चिंब

पावसाने धान चिंब

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकरी संकटात : ढगाळ वातावरणाने रबी पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून ढगाळी वातावरण कायम असून सोमवारी पहाटे व सायंकाळच्या सुमारास जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस बरसल्याने रबी पिकांसह धान पुंजन्यांचे नुकसान झाले. कुरखेडा, देसाईगंज, चामोर्शी तालुक्यात केंद्रावर विक्रीसाठी आणलेला धान भिजल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
कुरखेडा : सोमवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे कुरखेडा तालुक्यातील गोठणगाव, आंधळी, सोनसरी, येंगलखेडा व कुरखेडा या केंद्राच्या परिसरात ठेवलेले धानाचे पोते भिजले. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. धानाची विक्री करण्यासाठी कुरखेडा परिसरातील शेतकºयांनी विविध केंद्रांवर आपले धान आणले. तीन ते चार गाव मिळून महामंडळाच्या वतीने एक धान खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले. त्यामुळे एका गावाला आठवड्यातून केवळ एक दिवस धानाचा काटा करण्यासाठी मिळतो. अनेक शेतकरी थेट शेताच्या शेतातून आविकाच्या केंद्रांवर धान विक्रीसाठी आणतात. केंद्र परिसरात शेडची व्यवस्था नसल्याने खुल्या परिसरात धान ठेवले जाते. दरम्यान अवकाळी पाऊस झाल्याने शेतकºयांचे धान भिजून नुकसान झाले.
विसोरा : ढगाळी वातावरणामुळे देसाईगंज तालुक्याच्या विसोरा भागासह अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. या पावसाने विसोरा भागातील अनेक शेतकºयांचे धान पुंजने ओले झाल्याने शेतकºयांचे नुकसान झाले. आॅगस्ट महिन्याअखेरीस झालेला पाऊस सप्टेंबर, आॅक्टोबर, नोव्हेंबर व आता डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपल्यानंतर पुन्हा परतला. तब्बल १०० दिवसांनी झालेल्या या पावासाच्या सरींनी शेतकºयांचे नुकसान केले. सद्य:स्थितीत धान उत्पादक शेतकºयांच्या धान मळणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. अनेक शेतकºयांचे धान पुंजने अद्यापही शेतातच आहे. सोमवारी झालेल्या पावसाने धान पुंजने ओले झाले. नुकसानीच्या भितीपोटी आता शेतकरी हवालदिल झाला आहे. पेरणी, रोवणी, निंदन, कापणी, बांधणी व आता मळणी असे टप्पे शेतकºयांना पार करावे लागतात. सर्वत्र धान मळणीची लगबग सुरू असल्याने बहुतांश शेतकऱ्यांना वेळेवर मळणी यंत्र उपलब्ध होत नाही. परिणामी धान पुंजने तसेच शेतात ठेवावे लागतात. मळणीसाठी विलंब झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे धान पुंजने सोमवारी झालेल्या पावसात सापडले. पाऊस बंद होऊन कडक ऊन निघाल्यास धान पुंजने सडणार नाहीत. मात्र पुन्हा पाऊस झाल्यास धानाचे नुकसान निश्चित आहे. बळीराजा आता सुर्योदयाची आशा बाळगूण आहे. ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाने रबी हंगामातील तूर, मूग, लाखोळी, उडीद आदीसह भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले आहे.
आष्टी : आष्टी येथे सायंकाळी ६.४० वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. या पावसाचा फटका कापूस, तूर पिकांना बसला आहे. आष्टी भागात आज सकाळपासूनच ढगाळी वातावरण कायम होते. अवकाळी पावसाने या भागातील शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. आष्टी भागाला मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने चांगलेच झोडपले. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
सायंकाळच्या सुमारास देसाईगंज तालुक्याच्या विसोरा, शंकरपूर येथे पावसाला सुरूवात झाली आहे. देसाईगंज तालुक्यात १.०, कोरची तालुक्यात ६.३ पाऊस झाल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन विभागाने घेतली आहे. अवकाळी पाऊस व ढगाळी वातावरणामुळे टमाटर पिकासह इतर भाजीपाला पिकांना फटका बसला. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी होत आहे.

Web Title: Paddy chimba by rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार