जास्त प्रमाणात मतदान हा लोकशाहीचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 06:00 AM2020-01-26T06:00:00+5:302020-01-26T06:00:44+5:30

२५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून जिल्ह्यात साजरा केला जातो. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात नवमतदार, अपंग मतदार, विविध स्पर्धांमध्ये विजेते स्पर्धक यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी निवडणूक प्रक्रियेत शहिद झालेल्या कर्मचाºयांच्या कुटुंबांना शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीचे वितरणही करण्यात आले. या कार्यक्रमात मतदारांना प्रतिज्ञा देण्यात आली.

Over-voting is the victory of democracy | जास्त प्रमाणात मतदान हा लोकशाहीचा विजय

जास्त प्रमाणात मतदान हा लोकशाहीचा विजय

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशंसा; राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात नवमतदार व कर्मचाऱ्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली सारख्या दुर्गम भागात राज्याच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात मतदान होते, हा लोकशाहीचा विजय आहे. निवडणूक प्रक्रिया राबविणारे पोलीस व निवडणूक कर्मचारी यांचेही मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले.
२५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून जिल्ह्यात साजरा केला जातो. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात नवमतदार, अपंग मतदार, विविध स्पर्धांमध्ये विजेते स्पर्धक यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी निवडणूक प्रक्रियेत शहिद झालेल्या कर्मचाºयांच्या कुटुंबांना शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीचे वितरणही करण्यात आले. या कार्यक्रमात मतदारांना प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी उपस्थित पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मतदारांशी संवाद साधला. ते म्हणाले निवडणूक प्रक्रियेत काम करणारे बुथ पातळी ते जिल्हा स्तरावरचे अधिकारी, कर्मचारी या सर्वांचे योगदान पारदर्शक निवडणुका पार पाडण्यात महत्वाचे आहे. यापूर्वी जिल्ह्यात निवडणूका म्हटले की जीवीत हानीच्या घटना घडत होत्या. आता लोकशाही बळकट झाली आहे, असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमात पाच नवमतदार, पाच अपंग मतदारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट काम केलेल्या बीएलओंचा प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये गुरवळा शाळेतील शिक्षक ए.ए. देवळीकर, गडचिरोली नगर परिषद शाळेचे शिक्षक पी.डी. रामटेके, येवलीचे कृषी सहायक के.पी. सातार, शिवणी तलाठी एम.एन. भुरसे यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी कल्पना निळ- ठुबे यांनी केले. तर संचालन एस.के. चडगुलवार यांनी केले. आभार गडचिरोलीचे तहसिलदार महेंद्र गणवीर यांनी मानले.

आर्थिक मदत
राष्ट्रीय मतदार दिवस व लोकशाही पंधरवडा यानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेत विजय झालेल्या स्पर्धकांनाही सन्मानित केले. यावेळी मलमपोंडू भामरागड येथे २००९ मधील शहिद पोलीस कर्मचारी यांच्या कुटुंबातील सदस्यांना १० लाख रुपयांचा धनादेश वितरीत करण्यात आला. विधानसभा निवडणूक २०१९ दरम्यान बापू गावडे यांचा आकस्मिक मृत्यु झाला होता. त्यांच्या कुटुंबियांनाही यावेळी १५ लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी यांच्याहस्ते वितरीत करण्यात आला.

Web Title: Over-voting is the victory of democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.