शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! रुग्णवाहिकेतून डॉक्टर करायचा दारूची तस्करी, पोलिसांनी पकडले अन्...

By संजय तिपाले | Updated: September 17, 2024 17:09 IST

एका डॉक्टरला शासकीय रुग्णवाहिकेतून चक्क दारूची वाहतूक करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. यामुळे आरोग्य वर्तुळ हादरले आहे.

गडचिरोली : तापेने फणफणलेल्या दोन भावंडांचा मृत्यू झाल्यानंतर वाहन उपलब्ध करुन न दिल्याने जन्मदात्यांना मृतदेह खांद्यावर घेऊन १५ किलोमीटर पायपीट करावी लागल्याची घटना १२ दिवसांपूर्वी  अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथे उघडकीस आली होती. याच परिसरातील शेजारच्या भामरागड तालुक्यातून १७ सप्टेंबरला संतापजनक घटना समोर आली. एका डॉक्टरला शासकीय रुग्णवाहिकेतून चक्क दारूची वाहतूक करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. यामुळे आरोग्य वर्तुळ हादरले आहे.

ब्रम्हानंद रैनू पुंगाटी (२९, रा. बारसेवाडा ता. एटापल्ली) असे त्या डॉक्टरचे नाव आहे. नक्षलप्रभावित व आदिवासीबहुल पिपली बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्रात तो कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. १५  सप्टेंबर रोजी पहाटे हालेवारा पोलिस मवेली - हालेवारा - पिपली बुर्गी या मार्गावर नाकाबंदी करत होते.  

यावेळी (एमएच ३३ टी ४४७८) ही तेथून जात होती. रुग्णवाहिका असल्याने पोलिसांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले, पण चालकाने गाडी सुसाट नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी पाठलाग करत रुग्णवाहिका थांबवून तपासणी केली असता आत देशी दारूचे १० बॉक्स व विदेशी दारूच्या ९६ , बाटल्या आढळल्या. डॉ . ब्रम्हानंद पुंगाटीसह शशिकांत शशिकांत बिरजा मडावी (३३ रा. एटापल्ली),  सौरभ गजानन लेखामी ( २० रा. पिपली बुर्गी ), भिवाजी रैनू पदा  (३१, रा. पिपली बुर्गी) यांना ताब्यात घेतले तर अंधाराचा फायदा घेत दिलीप लालू लेखामी (रा. पिपली बुर्गी) हा पळून गेला. याप्रकरणी हालेवारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून देशी - विदेशी ८८ हजार ६० रुपयांची दारू व रुग्णवाहिका जप्त करण्यात आली आहे.  उपनिरीक्षक अक्षय पाटील अधिक तपास करत आहेत.

दोन दिवसांची पोलिस कोठडी दरम्यान, चारही आरोपींना १६ रोजी एटापल्ली न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.तात्काळ बडतर्फी पोलिसांच्या कारवाईनंतर जीला परिषद सीईओ आयुषी सिंह यांनी कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. ब्रम्हानंद पुंगाटी यास तडकाफडकी बडतर्फ केले आहे. यात सहभागी अन्य कर्मचारी रडारवर आहेत. त्यांच्यावरही कारवाई अटळ मानली जात आहे. 

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीPoliceपोलिसdoctorडॉक्टर