शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उघड्यावरील धानाची भाड्याच्या गाेदामात साठवणूक हाेणार

By दिलीप दहेलकर | Updated: May 21, 2024 15:23 IST

Gadchiroli : महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे प्रस्ताव सादर

गडचिराेली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने खरीप हंगामात धानाची खरेदी करण्यात आली. मात्र मिलर्सकडून धानाची उचल व भरडाई न झाल्याने काेट्यवधींचे धान उघड्यावर आहे. जिल्ह्यात १९४ काेटी रुपयांचे एकूण ८ लाख ९४ हजार क्विंटल धान केंद्राच्या परिसरात ताडपत्री झाकून उघड्यावर ठेवण्यात आले आहे. दरम्यान, या धानाचे पावसाच्या पाण्याने नुकसान हाेऊ नये, यासाठी महामंडळाच्या वतीने गाेदामे भाड्याने घेऊन त्यामध्ये धान सुरक्षितरीत्या साठविण्यात येणार आहे.

याबाबतचा प्रस्ताव आदिवासी विकास महामंडळाच्या अहेरी व गडचिराेली कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आला. महामंडळाच्या नाशिक येथील व्यवस्थापकीय संचालक कार्यालयाकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याची खात्रीशीर माहिती महामंडळाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.ताडपत्री झाकून उघड्यावर ठेवण्यात आलेल्या महामंडळाच्या धानाला अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. पुन्हा जून महिन्यापासून पावसाने झाेडपल्यास नुकसानाला जबाबदार काेण राहणार, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. गडचिराेली प्रादेशिक कार्यालयांतर्गत चालू वर्षातील खरीप हंगामात ५० केंद्रांवरून धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी अजूनही १०० काेटींपेक्षा अधिक रुपयांचे धान ताडपत्री झाकून उघड्यावर ठेवण्यात आले आहे. गडचिराेली कार्यालयांतर्गत खरेदी करण्यात आलेल्या एकूण धानापैकी ४ लाख ८५ हजार क्विंटल धान उघड्यावर आहे. अहेरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत एकूण ८ लाख ५५ हजार रुपयांचे धान खरीप हंगामात आविका संस्थांच्या मार्फतीने खरेदी करण्यात आले आहे. अहेरी उपविभागातही ४ लाख ९ हजार क्विंटल धान उघड्यावर आहे.

२२ काेटी रुपये लागणार

गाेदामे भाड्याने घेऊन त्यामध्ये धान साठविण्यात येणार आहे. गाेदाम भाड्यासह साठवणूक कामासाठी जवळपास २२ काेटी रुपयांचा खर्च शासनाला येणार आहे. महामंडळाच्या अहेरी कार्यालयाच्या क्षेत्रात १४ काेटी रुपये तर गडचिराेली कार्यालयाच्या क्षेत्रात ८ काेटी ६० लाख रुपये लागणार आहे. नाशिक कार्यालयाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात २२ काेटींचा निधी लागणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.विहित मुदतीत धानाची उचल नाही

खरीप हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धानाची उचल पावसाळ्यापूर्वी २० जून २०२४ पर्यंत शासनाच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र, मिलर्सने असहकार आंदाेलन पुकारल्यामुळे यंदा केंद्राच्या परिसरातून महामंडळाच्या धानाची उचल विहित मुदतीत हाेणार नाही.

मिलर्स ताठर भूमिकेवर ठाम

शासनाने मिलिंग व वाहतुकीचा दर वाढवावा, अशी मागणी मिलर्स असाेसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. महागाईच्या काळात जुन्या दरानुसार मिलिंग व वाहतूक करणे परवडत नसल्याने त्यांचा उचल करण्यास नकार आहे. मिलर्स असाेसिएशन आपल्या मागण्या व भूमिकेवर ठाम आहे. सदर प्रश्न शासनस्तरावर प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आला. याबाबत निर्णय झाला असून गाेदाम भाड्याने घेत त्यामध्ये धान साठवणूक करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे.उघड्यावरील धानाची भाड्याच्या गाेदामात साठवणूक हाेणार महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे प्रस्ताव सादर.  

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली