शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

शेती व शेतीसंलग्न व्यवसायच तारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 05:00 IST

खरीप हंगामाअगोदर पालकमंत्र्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक, उपविभागीय कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी यांच्याबरोबर सन २०२०-२१ मधील विविध उपाययोजनांबाबत चर्चा केली. जिल्ह्यातील पाऊस जास्त आहे आणि समान कालावधीत पडतो. त्यामुळे खरीप हंगाम चांगल्या प्रकारे होतो. याचा फायदा घेवून शेतकऱ्यांना विविध आर्थिक व शास्त्रीय पाठबळ देवून चांगल्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत, असे ना.वडेट्टीवार म्हणाले.

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांची सूचना : खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत विविध उपाययोजनांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोना संचारबंदीमुळे देशासह राज्यातही उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत. या पार्श्वभूमीवर आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी शेतीशेतीपूरक व्यवसायच महत्वपूर्ण ठरणार आहेत. त्यामुळे त्याला चालना द्या, अशी सूचना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी खरीप हंगामपूर्व जिल्हास्तरीय आढावा बैठकीत केली.संचारबंदीमुळे मोडकळीस आलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येईल यावर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शेती व बिगरशेती व्यवसायांना चालना देण्यासाठी काय-काय करता येईल, यावरही यावेळी चर्चा करण्यात आली. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, खासदार अशोक नेते, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, कृषी सभापती रमेश बारसागडे, जि.प.सदस्य अ‍ॅड.राम मेश्राम, उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते.खरीप हंगामाअगोदर पालकमंत्र्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक, उपविभागीय कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी यांच्याबरोबर सन २०२०-२१ मधील विविध उपाययोजनांबाबत चर्चा केली. जिल्ह्यातील पाऊस जास्त आहे आणि समान कालावधीत पडतो. त्यामुळे खरीप हंगाम चांगल्या प्रकारे होतो. याचा फायदा घेवून शेतकऱ्यांना विविध आर्थिक व शास्त्रीय पाठबळ देवून चांगल्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत, असे ना.वडेट्टीवार म्हणाले.बंद पडलेले सिंचन प्रकल्प, अपूर्ण व कामे सुरू न झालेल्या सिंचन विहिरी याबाबत पाठपुरावा करून तातडीने कामे पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. महावितरणकडून ४ हजार पाचशेपेक्षा जास्त कृषी पंपांना जोडणी देण्याचे काम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यात बोगस बियाणे येणार नाही, तसेच शेतीसाठी आवश्यक खतांचा काळाबाजार होणार नाही, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी त्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपविली. जिल्ह्यात १५ हजार हेक्टरवर कापूस पीक घेतले जाते. चोर बीटी कापूस या जिल्ह्यात येवू नये यासाठी प्रशासनाने आवश्यक काळजी घ्यावी. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. याबाबत पालकमंत्री यांनी आपण उच्चस्तरावर परराज्यातून येणाºया चोर बीटीबाबत बैठक घेणार असल्याचे सांगितले.तेंदूपत्ता हंगामाबाबत येणाºया अडचणींवर यावेळी चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तेंदूपत्ता संकलन हा मुख्य आर्थिक स्त्रोत आहे. यासाठी संचारबंदीमधून या व्यवसायाला सूट देण्यात आली आहे. संकलन करणारे मजूर, ठेकेदार व प्रशासनातील कर्मचारी यांनी कोरोनाबाबत आवश्यक ती काळजी घेवून ही प्रक्रि या राबवावी. प्रशासन यासाठी आवश्यक वाहतूक व संकलनास विहीत पध्दतीने मंजुरी देत आहे, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. ठेकेदार आणि त्यांच्या मजुरांच्या वाहतुकीसंदर्भात वनविभागातील अधिकाºयांमार्फत पोलीस विभागाशी समन्वय ठेवून आवश्यक त्या परवानग्या देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.धानाचे दुबार पीक घेण्यावर भर द्याजिल्ह्यात धान लागवड क्षेत्र २ लाख ५ हजार हेक्टरवरून२ लाख २२ हजार हेक्टरपर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. जर १०५ दिवसात भरणाºया रबी धानाच्या वाणाची लागवड केली तर शेतकºयांना निश्चितच दुबार पीक घेऊन आणि चांगले उत्पादन घेता येईल.शेतीबाबत असणाºया विविध योजनांचे लाभार्थी निवडताना पारदर्शकता आणून कृषी अधीक्षक, कृषी विज्ञान केंद्र आणि जिल्हा परिषद कृषी विभाग यांनी समन्वय साधून काम करावे. पीक कर्जाबाबत येणाºया अडचणी लक्षात घेवून आवश्यक मदत अगोदरपासूनच करावी. जेणेकरून त्यांना वेळेवर कर्ज घेवून हंगाम चांगल्या प्रकारे घेता येईल, असे पालकमंत्री म्हणाले.कोविड-१९ प्रयोगशाळेचा प्रस्तावकोरोना (कोविड-१९) तपासणीबाबत जिल्ह्यात प्रयोगशाळा सुरू करण्याचा प्रस्ताव राज्याला सादर करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी दिला. जिल्ह्यात मोठया संख्येने बाहेरील मजूर आले आहेत. तसेच शेजारील तेलंगणा व छत्तीसगड राज्यातून कित्येक मजूर छुप्या मार्गाने राज्यात प्रवेश करत आहेत. या पाशर््वभूमिवर जिल्ह्यात कोरोना नमुने तपासणी लॅब असणे आवश्यक असल्याचा मुद्दा बैठकीतील चर्चेत समोर आला. याबाबत पालकमंत्र्यांनी तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले. याबाबत राज्यस्तरावर पाठपुरावा करून त्यास मंजुरी घेण्यात येईल, असे त्यांनी उपस्थितांना सांगितले. यासाठी आवश्यक निधी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांची माहिती तातडीने घ्याजिल्हयातील संचारबंदीमुळे अडचणीत आलेल्या रेशन कार्ड नसलेल्या गरीब नागरीकांची माहिती घेण्याचे कार्य तातडीने पूर्ण करा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी पुरवठा विभागाला दिल्या. यातून गोरगरीब गरजू लोकांना तातडीने मदत पोहचविता येईल. याबाबत तहसीलदार यांना आवश्यक सूचना देवून माहिती संकलित केली जात आहे. या माहितीच्या आधारे गरजू लोकांना आवश्यक मदत पोहचिवण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. यातून त्यांना धान्य व इतर आवश्यक साहित्य पोहचवण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात येणार आहे.बोअरवेलच्या गाड्यांना वाहतुकीसाठी परवानगीउन्हाळयाच्या पाशर््वभूमिवर जिल्ह्यात गरजू लोकांना पाण्याची उपलब्धता वेळेत होण्यासाठी बोअरवेलच्या गाडयांना तातडीने परवानगी देण्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रशासनाला निर्देश दिले.आठवड्यातून ५ दिवस कापूस खरेदीचामोर्शी येथील कापूस खरेदी केंद्रावर आठवडयातील दोनच दिवस कापूस खरेदी सुरू आहे. परंतू आता आठवड्यातील ५ दिवस ही खरेदी सुरू करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक कापूस तपासणी ग्रेडर उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी वरिष्ठ पातळीवर केल्या.

टॅग्स :agricultureशेतीVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार