शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीमध्ये ६६ टक्केच पाऊस, मुसळधार कधी बरसणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 16:25 IST

केवळ १४४.७ मिमी पावसाची नोंद : शेतकरी सापडले चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जून महिना संपला असून या महिन्यात जिल्ह्यात केवळ १४४.७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सरासरी जून महिन्यात २१० मिमी पावसाची नोंद करण्यात येते. मात्र यंदा केवळ ६६ टक्के पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली असली तरी दमदार पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वजण अजूनही मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. 

७ जूनपासून पावसाच्या मृग नक्षत्राला प्रारंभ झाला. या नक्षत्रात जिल्ह्यात आठवडाभर पावसाचा थांगपत्ता नव्हता. मात्र त्यानंतर जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. मात्र हा पाऊस जिल्ह्याच्या काही भागात जोरदार तर काही भागात कमी पडला. या पावसाने खरीप हंगामाच्या धान व इतर पेरणीला सुरुवात झाली. त्यानंतर आर्द्रा नक्षत्र सुरू झाला. या नक्षत्रातही पावसाला जोर नाही.

सिरोंचा व भामरागड तालुक्यात चांगला पाऊस जून महिन्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत जेमतेम अर्धाच पाऊस पडला. जिल्ह्यातील काही तालुके वगळता निम्म्याहून अधिक तालुक्यामध्ये अत्यल्प पाऊस झाला आहे. केवळ सिरोंचा तालुक्यात अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजेच २४० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. भामरागड तालुक्यातही अपेक्षित पाऊस म्हणजे १७९ मिमी पाऊस झाला. याशिवाय काही तालुक्यांमध्ये सामान्य पाऊस झाला आहे. मात्र जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक तालुक्यांमध्ये अपेक्षेपेक्षा निम्मा पाऊस झाला आहे.

हवामान विभागाचा अंदाज १०० टक्के खरा होईनायंदा हवामान विभागाने राज्यासह जिल्ह्यात सर्वत्र चांगल्या पावसाचे संकेत दिले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने पिकांची पेरणी केली. जिल्ह्यात सर्वाधिक धान पिकाची केली जाब शेतकऱ्यांनी धानासह कापूस, सोयाबीन आदी पिकांची पेरणी केली. हवामान विभागाकडून दररोजच पावसाचा अंदाज व सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. मात्र हवामान विभागाचा अंदाज १०० टक्के खरा होत नसल्याचे दिसून येते. जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. 

टॅग्स :Rainपाऊसmonsoonमोसमी पाऊसMonsoon forecastमोसमी पावसाचा अंदाजGadchiroliगडचिरोली