लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रबीतील कांद्याचे पीक निघताच कांद्याचे भाव प्रचंड प्रमाणात गडगडले आहेत. रविवारी गडचिरोली आठवडी बाजारात कांद्याचे ट्रक आले होते. ४० किलोचा कट्टा ३०० ते २५० रूपये दराने विकला जात होता.सर्वच भाज्यामध्ये कांद्याचा वापर होत असल्याने वर्षभर काद्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होते. मात्र कांद्याचे उत्पादन वर्षातून दोन ते तीनच वेळा होते. त्याचबरोबर कांदा व्यवस्थित ठेवला नाही तर तो लवकरच खराब होतो. परिणामी कांद्याच्या साठवणुकीवर बराच खर्च होत असल्याने कांद्याचे भाव ५० ते १०० रूपये किलोपर्यंत गेले असल्याचे दिसून येते. १५ दिवसांपूर्वीपर्यंत कांद्याचे भाव २० रूपये किलो होते. मात्र आता रबी हंगामात लावलेला कांदा निघाला आहे. कांद्याची प्रचंड प्रमाणात उत्पादन झाले आहे. त्यामुळे गडचिरोली येथील आठवडी बाजारात नऊ ते दहा ट्रक कांदे विक्रीसाठी आणण्यात आले होते. एका कट्ट्यामध्ये ४० किलो कांदे भरले होते. याची किंमत दुपारी २ वाजेपर्यंत ३५० रूपये ठेवली होती. मात्र विक्री होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर व्यापाऱ्यांनी कांद्याचे भाव ३०० रूपये प्रती कट्टापर्यंत उतरविले. तर काही व्यापाºयांनी २५० रूपये दरानेही कांदे विक्री केले.उन्हाळ्यात कांदे अत्यंत स्वस्त मिळतात. पावसाळ्यात मात्र हेच कांदे २० ते ३० रूपये किलो दराने खरेदी करावे लागत असल्याने उन्हाळ्यात काही नागरिक एकाच वेळी ४० किलोचा कट्टा खरेदी करतात. त्यामुळ या कालावधीत मागणी वाढते.मिरची तडकलीयावर्षी लाल मिरचीचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे यावर्षी हिरव्या मिरचीचेही भाव १० रूपये पावच्या कमी नव्हते. लाल मिरचीही १०० ते १५० रूपये किलो दराने विकली जात आहे. मागील वर्षीच्या तुलनेत मिरचीचे भाव वाढले आहेत. पावसाळ्यात मिरची आणखी महागण्याची शक्यता व्यापाºयांनी वर्तविली.
कांद्याचे भाव गडगडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 01:11 IST
रबीतील कांद्याचे पीक निघताच कांद्याचे भाव प्रचंड प्रमाणात गडगडले आहेत. रविवारी गडचिरोली आठवडी बाजारात कांद्याचे ट्रक आले होते. ४० किलोचा कट्टा ३०० ते २५० रूपये दराने विकला जात होता.
कांद्याचे भाव गडगडले
ठळक मुद्देबाजारात ट्रक दाखल : ३०० रूपयात ४० किलोचा कट्टा