शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
2
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
3
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
4
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
5
त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव
6
Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
7
७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?
8
१७,००० चा AI प्रोग्राम एअरटेल देणार मोफत! काय आहे पर्प्लेक्सिटी AI? फायदे वाचून थक्क व्हाल!
9
डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी
10
बायकोशी कडाक्याचं भांडण झालं, नवरा रागाच्या भरात तडक चालत निघाला-पाहा कुठं पोहचला... 
11
Patna Hospital Firing: रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ
12
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
13
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
14
हिंदू बनून फसवलं, सौदीत विकण्याचा डाव, धर्म बदलला नाही म्हणून गँगरेप; पीडितेने सांगितला थरारक प्रसंग
15
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
16
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
17
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
18
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
20
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”

एक हजार शेतकऱ्यांना लाभ

By admin | Updated: September 13, 2014 23:54 IST

कृषी संजीवनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करीत कृषी विभागांतर्गत जिल्ह्यातील १ हजार ४०८ शेतकऱ्यांना कृषी संजीवनी योजनेचा लाभ देण्यात आला आहे. कृषी संजीवनी योजनेंतर्गत आॅगस्ट महिन्यात

गडचिरोली : कृषी संजीवनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करीत कृषी विभागांतर्गत जिल्ह्यातील १ हजार ४०८ शेतकऱ्यांना कृषी संजीवनी योजनेचा लाभ देण्यात आला आहे. कृषी संजीवनी योजनेंतर्गत आॅगस्ट महिन्यात अनेक शेतकऱ्यांनी योजनेच्या माध्यमातून स्वत:चा फायदा करून घेतला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २६.३२ लाखांची थकबाकी भरली. त्यामुळे या योजनेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. कृषी संजीवनी योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे कृषी पंपाच्या विद्युत बिलाची थकबाकी आहे, अशा शेतकऱ्यांनी थकीत बिलाचा भरणा एका हफ्त्यात अथवा तीन हफ्त्यात करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तीन हफ्त्यात वीज बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना पहिला हफ्ता म्हणून ३१ आॅगस्ट २०१४ पर्यंत २० टक्के रक्कम भरावयाचे होते. दुसऱ्या टप्प्यात २० सप्टेंबरपर्यंतचे २० टक्के रक्कम व तिसऱ्या टप्प्यात ३१ आॅक्टोंबरपर्यंत १० टक्के रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रत्येक विद्युत बिलाची ५० टक्के रक्कम एकत्र भरल्यानंतर महावितरण कंपनीच्यावतीने शेतकऱ्यांच्या उर्वरित वीज बिलावरील व्याज व विलंब शुल्क माफ करण्यात येते. १ आॅगस्ट ते ३१ आॅगस्ट २०१४ या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यातील १ हजार ४०८ कृषी पंपधारक शेतकऱ्यांनी २६.३२ लाख रूपये भरून कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेतला आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे. ३१ मार्च २०१६ पर्यंत ज्या कृषीपंप विद्युत ग्राहकांवर कोणत्याही प्रकारची थकबाकी नसेल, अशा स्थितीत शेतकऱ्यांना आगामी दोन त्रैमासिक बिलात ५० टक्के सूट दिल्या जात आहे. ज्या कृषी पंपधारक शेतकऱ्यांनी अद्यापही कृषी संजीवनी योजनेमध्ये सहभाग घेतला नाही, अशा ग्राहकांना अपात्र ठरविण्यात येणार आहे. नियमानुसार व्याज व विलंब शुल्कासह थकीत बिल ग्राहकांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणच्यावतीने देण्यात आली आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य कृषीपंपधारकांकडे कोट्यवधी रूपयांची थकबाकी आहे. आलापल्ली उपविभागात १७५ कृषी पंपधारकांकडे ५ लाख २९ हजार ११६.३४, चामोर्शी उपविभागात ९०४ कृषी पंपधारकांकडून २१ लाख ४१ हजार १५२.५४ रूपये, एटापल्ली उपविभागात तीन कृषी पंपधारकांकडे १३००.८५, मुलचेरा उपविभागात १२१ कृषी पंपधारकांकडे २ लाख ६२ हजार ८३९.०३ रूपयांची थकबाकी आहे. तर सिरोंचा उपविभागात १५२१ कृषी पंपधारकांकडे तब्बल १ कोटी ४१ लाख ९८ हजार ९५६.०८ रूपयांची थकबाकी आहे. (शहर प्रतिनिधी)