लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील वर्ग ३ व वर्ग ४ च्या नोकरभरतीत केवळ अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना स्थान देऊन ओबीसींवर अन्याय केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी ११ सप्टेंबरच्या परिपत्रकाची होळी केली. शिवाय शहरातून बाईक रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.९ जून २०१४ च्या राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील वर्ग ३ व वर्ग ४ च्या पदभरतीत शंभर टक्के अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यात विविध संवगार्तील १३ पदांचा समावेश असून, गैरआदिवासींना वगळण्यात आले आहे. त्यानंतर ११ सप्टेंबर २०१८ रोजी राज्य शासनाने एक परिपत्रक काढून आणखी ५ पदांची भर घातली आहे. त्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रुचित वांढरे व कार्याध्यक्ष किरण कटरे यांच्या नेतृत्वात आज इंदिरा गांधी चौकात ११ सप्टेंबरच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणा दिल्या. त्यानंतर बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीत राहुल भांडेकर, दिनेश चापले, विकेश नैताम, संजय कुकुडकर, आदित्य डोईजड, परमानंद पुनमवार, प्रभाकर झरकर, प्रतीक डांगे, स्वप्नील घोसे, सचिन गेडाम, अंकित सोनटक्के, दिलीप नंदेश्वर, चेतन शेंडे, अक्षय चलाख, सुशांत मोहुर्ले, पंकज नंदगिरवार, संजित कोटांगले, जगन्नाथ चव्हाण, मनोज कोठारे, चरण भुरसे, पुष्पा करकाडे, नूतन कुंभारे यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यानंतर जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप सरकार व लोकप्रतिनिधींविरुद्ध घोषणा देत संताप व्यक्त केला.
ओबीसी युवकांनी केली अन्यायकारक जीआरची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 01:25 IST
जिल्ह्यातील वर्ग ३ व वर्ग ४ च्या नोकरभरतीत केवळ अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना स्थान देऊन ओबीसींवर अन्याय केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी ११ सप्टेंबरच्या परिपत्रकाची होळी केली.
ओबीसी युवकांनी केली अन्यायकारक जीआरची होळी
ठळक मुद्देसरकार व भाजप पक्षाचा निषेध : शहरातून काढली ओबीसी जागर रॅली