शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

बालकांच्या आरोग्यासाठी पोषणयुक्त तांदूळ फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 23:37 IST

देशात नियमित होत असलेल्या सर्व्हेक्षण अहवालाच्या आधारे कुपोषणाचे कारण लक्षात आले. विशेष करून ज्या भागात भाताचे विपुल प्रमाणात उत्पादन होते, त्याच भागात कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे देशात पोषणतत्व गुण संवर्धीत (फोर्टिफाईड) तांदूळ प्रकल्प सुरू करण्याच्या पूर्वी प्रायोगिक तत्वावर आरमोरी येथे सदर प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात येत आहे.

ठळक मुद्देगिरीष बापट यांचे प्रतिपादन : आरमोरीत फोर्टिफाईड तांदळाच्या पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : देशात नियमित होत असलेल्या सर्व्हेक्षण अहवालाच्या आधारे कुपोषणाचे कारण लक्षात आले. विशेष करून ज्या भागात भाताचे विपुल प्रमाणात उत्पादन होते, त्याच भागात कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे देशात पोषणतत्व गुण संवर्धीत (फोर्टिफाईड) तांदूळ प्रकल्प सुरू करण्याच्या पूर्वी प्रायोगिक तत्वावर आरमोरी येथे सदर प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात येत आहे. आदिवासी भागातील कुपोषण निर्मूलनासाठी तसेच बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी हा पोषणयुक्त आहार फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण तथा अन्न औषध प्रशासन मंत्री गिरीष बापट यांनी केले.अन्न-नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग तसेच टाटा ट्रस्ट मुंबईच्या सहकार्याने फोर्टिफाईड तांदूळ प्रकल्पाचा शुभारंभ गुरूवारी येथील जेना अ‍ॅग्रो राईस मिलमध्ये करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार, आमदार कृष्णा गजबे, प्रधान सचिव महेश पाठक, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी संपत खलाटे, राईस मिलचे संचालक हैदरभाई पंजवानी, टाटा ट्रस्टच्या सोनल आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना ना.बापट म्हणाले, आदिवासी भागातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी फोर्टिफाईड तांदूळ वितरणाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम गडचिरोली जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांमार्फत सुरू होत आहे. प्रशासकीय यंत्रणेने गरजू लोकांपर्यंत धान्य व्यवस्थित पोहोचेल, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केली.याप्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रास्ताविकातून फोर्टिफाईड तांदूळ वितरण उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. सन २०१५-१६ च्या चौथ्या राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रातील सहा महिने ते पाच वर्ष या वयोगटातील ५३.०८ टक्के मुलांमध्ये तसेच १५ ते ४९ वर्ष वयाच्या महिलांमध्ये ४८ टक्के तर गर्भवती महिलांमध्ये ४७.०९ टक्के इतक्या प्रमाणात अ‍ॅनिमिया झाल्याचे दिसून आले आहे. त्यांच्यात पोषणद्रव्ये वाढविण्यासाठी फोर्टिफाईड तांदूळ पुरविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.याप्रसंगी जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, आमदार कृष्णा गजबे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. नरेंद्र आरेकर यांनी तर आभार जिल्हा पुरवठा अधिकारी संपत खलाटे यांनी मानले.ओबीसींच्या शिष्टमंडळाला अपमानजनक वागणूकजिल्ह्यातील ओबीसींचे १९ टक्क्यांवरून ६ टक्के झालेले आरक्षण पूर्ववत १९ टक्के करून झालेला अन्याय दूर करण्याची मागणी करण्यासाठी ओबीसींचे शिष्टमंडळ पालकमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी गेले. यावेळी एका ज्येष्ठ नेत्याने या शिष्टमंडळाला अपमानजनक वागणूक देऊन बाहेर जाण्यास सांगितले. या प्रकाराचा तिथेच निषेध करण्यात आला. यावेळी मिलींद खोब्रागडे, अतुल आकरे, दिलीप घोडाम, कुमेश धुपाजारे, साबीर शेख, सारंग जांभुळे, नितेश मेश्राम, नरेश गजभिये, सचिन हेमके इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.लोहयुक्त मिठाचेही वितरण होणारजिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या या प्रायोगिक तत्वावरील उपक्रमास टाटा ट्रस्टची मदत प्राप्त झाली आहे. फोर्टिफाईड तांदळासोबतच लोहयुक्त मिठाचे वितरण सुध्दा स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, असे यावेळी ना. बापट यांनी सांगितले.

टॅग्स :girish bapatगिरीष बापट