न.प. सभापतींची होणार खांदेपालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:45 AM2019-01-19T00:45:29+5:302019-01-19T00:46:32+5:30

गडचिरोली नगर पालिकेतील विषय समिती सभापतींचा कार्यकाळ येत्या २२ जानेवारी रोजी संपणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी कार्यक्रम घोषित केला आहे. २१ जानेवारी रोजी सोमवारला गडचिरोली पालिकेत विशेष सभा बोलविण्यात आली आहे.

NP The chairmanship of the chairmanship will be | न.प. सभापतींची होणार खांदेपालट

न.प. सभापतींची होणार खांदेपालट

Next
ठळक मुद्दे२१ ला सभापतींची निवडणूक : अनेक जण उत्सुक, महिलाही सूत्र स्वीकारण्यास तयार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली नगर पालिकेतील विषय समिती सभापतींचा कार्यकाळ येत्या २२ जानेवारी रोजी संपणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी कार्यक्रम घोषित केला आहे. २१ जानेवारी रोजी सोमवारला गडचिरोली पालिकेत विशेष सभा बोलविण्यात आली आहे. या सभेत पालिकेचे नवे सभापती ठरणार आहेत. या निवडणुकीत जुन्या सभापतींना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता नसल्याने खांदेपालट होणार असल्याचे बोलले जात आहे.
गडचिरोली पालिकेत बांधकाम, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व आरोग्य, महिला व बालकल्याण, नियोजन विकास आदी सहा सभापतींची निवड केली जाते. तसेच महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापतीपदी एका महिला नगरसेविकेची निवड केली जाते. गडचिरोली पालिकेत एकूण १२ प्रभाग मिळून २५ नगरसेवक आहेत. यामध्ये भाजपाचे २३, काँग्रेसचा एक व समाजवादी पार्टीचा एक असे पक्षीय बलाबल आहे.
सभापती निवडीचा कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केला आहे. त्यानुसार सोमवारी दुपारी १२ ते २ या वेळेत पक्षाचे गटनेते सभापती पदासाठीच्या उमेदवाराची यादी पिठासीन अधिकाऱ्यांकडे सादर करतील. त्यानंतर इच्छुक उमेदवार सभापतीपदासाठी नामंकन सादर करतील. एका पदासाठी एकापेक्षा अधिक उमेदवारांचे अर्ज आल्यास निवडणूक घेतली जाईल. शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून बांधकाम व आरोग्य तथा स्वच्छता, तसेच पाणीपुरवठा समितीचे सभापतीपद महत्त्वपूर्ण आहे. सदर विषय समितीचे सभापतीपद मिळविण्यासाठी अनेक नगरसेवकांची इच्छा असते. आताही महत्त्वाचे सभापतीपद मिळविण्यासाठी अनेकांकडून फिल्डींग लावली जात आहे. नगर पालिकेच्या कायद्यानुसार सभापतीपदाच्या निवडणुकीत नगराध्यक्ष व तीन स्वीकृत सदस्यांना मतदानाचा अधिकार नाही. मात्र नगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य बैठकीला उपस्थित राहू शकतात.
महिलांचे संख्याबळ जास्त
गडचिरोली नगर पालिकेची स्थापना ३१ मे १९८५ ला झाली. त्यानंतर १९८५ ते १९९१ पर्यंत या पालिकेवर प्रशासन होते. त्यानंतर १९९१ मध्ये नगर पालिकेची पहिली निवडणूक पार पडली. पालिकेच्या निर्मितीला ३३ वर्ष पूर्ण होत असले तरी २७ वर्षांच्या कार्यकाळात सहा वेळा निवडणूक झाली आहे. ५० टक्के आरक्षणानुसार गडचिरोली पालिकेत नगरसेवक म्हणून १३ महिलांना संधी मिळाली आहे. पालिकेत १२ पुरूष नगरसेवक आहेत. नगराध्यक्ष मिळून महिलांचे संख्याबळ पुरूषांपेक्षा अधिक आहे.

महत्त्वाच्या पदांवर महिलांना संधीच नाही
नगर पालिकेतील महिला व बालकल्याण हे पद महिलांसाठी राखीव आहे. गडचिरोली पालिकेच्या २७ वर्षांच्या कार्यकाळात एकाही नगरसेवक महिलेला बांधकाम, आरोग्य व स्वच्छता तसेच पाणीपुरवठा या महत्त्वाच्या सभापतींचे पद मिळाले नाही. शिक्षण समितीचे सभापतीपदही यापूर्वीच्या कार्यकाळात महिला नगरसेवकाला मिळाले नाही. पालिकेवर भाजपची सत्ता आल्यानंतर गतवर्षी एका नगरसेवक महिलेला शिक्षण समितीचे सभापतीपद देण्यात आले. एकूणच पालिकेच्या सत्तासूत्रात महिलांना अपेक्षित स्थान मिळाल्याचे दिसून येत नाही. नगरसेवकपदासाठी ५० टक्के महिला आरक्षण असतानाही सभापतीपदावर मात्र बºयाच वेळा पुरूष नगरसेवकांचीच वर्णी लावल्या जात आहे.

Web Title: NP The chairmanship of the chairmanship will be

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.