शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

रस्त्यावर खड्डे नाही, आता शेती! नागरिकांचा हटके विरोध आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 18:22 IST

Gadchiroli : जिमलगट्टा येथे अनोखे आंदोलन, वेधून घेतले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कजिमलगट्टा : तेलंगणाला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी वर जिमलगट्टा (ता. अहेरी) येथे मोठमोठे खड्डे पडले आहेत. याकडे महामार्ग विभागाससह जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १८ ऑगस्ट रोजी स्थानिक नागरिकांनी खड्ड्यांत धान रोवणी केली, तसेच वृक्षलागवड करून निषेध नोंदविला.

गेल्या अनेक महिन्यांपासून या महामार्गाची दुरवस्था झाली असून, वाहनचालक आणि स्थानिक रहिवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. खराब रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. १० दिवसांत तत्काळ खड्डे बुजवावेत, रखडलेले महामार्गाचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे, या मागणीसाठी १८ ऑगस्टला सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांच्या नेतृत्वात धान रोवणी व वृक्षलागवड केली. 

अपघाताचा वाढला धोकामहामार्गाची दयनीय अवस्था झाल्यामुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत. मागील तीन वर्षापासून ही स्थिती असून अनेकदा विनंती करून, निवेदने देऊनही महामार्ग विभागाने उपाययोजना केल्या नाही. त्यामुळे स्थानिकांमध्ये रोष आहे. खड्डे चुकविताना अपघात होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

...तर तीव्र आंदोलनयाबाबत उपाययोजना न केल्यास अधिक तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा संतोष ताटीकोंडावार यांनी दिला. मरपल्लीचे सरपंच शंकर नैताम, ग्रा.पं. सदस्य सालाया कंबलवार, राजू मामीडवार, कोंजेडच्या माजी सरपंच ज्योती मडावी, यशवंत डोंगरे, स्नेहदीप आत्राम, शंकर रंगूवार, अरुण वेलादी, साईश उपग्नलावार, नंदेश्वर मेश्राम, शैलेश कोडापे, महेश बोरकुट आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीroad safetyरस्ते सुरक्षा