शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
4
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
5
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
6
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
7
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
8
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
9
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
10
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
11
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
12
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
13
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
14
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
15
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
16
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
18
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
19
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
20
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई

गावालगतच्या आमराई परिसरातून नऊ ड्रम गुळसडवा नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:24 IST

तालुक्यातील रंगयापल्ली गावालगत असलेल्या आमराईत विक्रेत्यांनी दारू गाळण्यासाठी लपवून ठेवलेला नऊ ड्राम गुळसडवा मुक्तिपथ तालुका चमूने शुक्रवारी नष्ट केला. सोबतच दारू गाळण्यासाठी वापरात येणारे साहित्यही नष्ट केले.

ठळक मुद्देमुक्तिपथची कारवाई : रंगयापल्ली गावात दारुविक्रेत्यांचा हैदोस; अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुक्यातील रंगयापल्ली गावालगत असलेल्या आमराईत विक्रेत्यांनी दारू गाळण्यासाठी लपवून ठेवलेला नऊ ड्राम गुळसडवा मुक्तिपथ तालुका चमूने शुक्रवारी नष्ट केला. सोबतच दारू गाळण्यासाठी वापरात येणारे साहित्यही नष्ट केले.रंगयापल्ली हे गाव येथील दारू विक्रेत्यांमुळे येथील नागरिकांसह इतरही गावांसाठी डोकेदुखी बनले आहे. मुक्तिपथ गाव संघटनेच्या पुढाकाराने दारूविक्री बंदीचा ठरावही घेण्यात आला आहे. मुजोर झालेले विक्रेते दारूविक्री करीतच आहे. यामुळे गावाचे सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे. गावातील दारूविक्री बंद व्हावी यासाठी गुरुवारी ग्रामपंचायत प्रशासन आणि गाव संघटनेद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीतील विषयाचा पाठपुरावा करण्यासाठी मुक्तिपथ तालुका चमू शुक्रवारी या गावात गेली. तालुका चमू परत येत असताना गावानजीकच्या आमराईमध्ये दारूच्या भट्ट्या असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी हा परिसर पिंजून काढला असता दारू गाळून विक्रेत्यांनी साहित्य झाडावर लपवून ठेवल्याचे लक्षात आले. संशयित जागा खोदल्या असता ९ ड्राम गुळाचा सडवा जमिनीखाली गाडून ठेवल्याचे लक्षात आले. हा सडवा नष्ट केला.५० किलो साखरही नष्टमुक्तिपथने काहीच दिवसांपूर्वी अहेरी तालुक्यात पांढऱ्या गुळाची होत असलेली साठेबाजी उघड केली. यावर पर्याय म्हणून आता साखरेची दारू बनविण्याचा प्रकार सिरोंचा तालुक्यात सुरू झाला आहे. याच परिसरात दारूसाठी ठेवून असलेली ५० किलो साखरही मुक्तिपथ कार्यकर्त्यांनी नष्ट केली. या कारवाईने धाबे दणाणले आहेत.दुचाकीसह ६५ हजारांचा मुद्देमाल जप्तदेसाईगंज पोलिसांनी गुरूवारी निरंकारी भवन परिसरात धाड टाकून दुचाकीसह ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई केली. गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विक्की प्रदीप सिडाम (२५) रा. आंबेडकर वार्ड देसाईगंज अशी आहे. आरोपी देसाईगंजकडून कोंढाळाकडे पांढऱ्या रंगाच्या दुचाकीने विदेशी दारू नेत होता. पोलिसांनी सदर गाडी पकडून या गाडीतून ३५ हजार रुपये किमतीची विदेशी दारू जप्त केली. दारू विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई देसाईगंज पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार बंडे व इतर पोलिसांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार प्रदीप लांडे यांच्या मार्गदर्शनात नाईक पोलीस शिपाई सदाशिव धांडे करीत आहेत.

टॅग्स :liquor banदारूबंदी