शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
2
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
3
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
4
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
5
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
6
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
7
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
8
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
9
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
10
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
11
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
12
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
13
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव
15
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
16
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
17
‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’
18
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
19
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
20
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ

भाजपचे नऊ पदाधिकारी जिल्हा नियोजन समितीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 11:51 PM

जिल्हा नियोजन समितीवर जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या लोकनियुक्त सदस्यांची निवड होणे गरजेचे असते. वर्षभरापूर्वी दोन वेळा त्यासंदर्भातील निवडणूक कार्यक्रमही जाहीर केला होता. पण आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा ती निवडणूक रद्द करण्यात आली.

ठळक मुद्देशासनाची मान्यता : विशेष निमंत्रित म्हणून केली नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित म्हणून भारतीय जनता पार्टीतील पाच पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीस राज्याच्या नियोजन विभागाने २८ ऑगस्ट २०१९ रोजी मान्यता प्रदान केली.त्या निमंत्रित सदस्यांमध्ये भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी बाबुराव कोहळे, गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, चामोर्शीच्या नगराध्यक्ष प्रज्ञा उराडे, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष किसन नागदेवे, तसेच स्वप्नील वरघंटे, रवींद्र ओल्लालवार, रवीकिरण समर्थ, प्रशांत वाघरे, रमेश भुरसे आदींचा समावेश आहे.महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (रचना व कामे), (सुधारणा) अधिनियम कलम ३ चे पोटकलम ३ (४) (फ) मधील तरतुदीनुसार जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या व सामान्यपणे जिल्हा नियोजन समितीच्या क्षेत्रातील निवासी असलेल्या ९ व्यक्तींंची विशेष निमंत्रित म्हणून गडचिरोली जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती करण्यास शासनाने मान्यता प्रदान केली आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ही नियुक्ती करण्यात आली. विधानसभा निवडणुकीनंतर नव्याने जिल्हा नियोजन समितीचे गठन होईपर्यंत या सदस्यांचे सदस्यत्व कायम राहणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रतिनिधींना हुलकावणीजिल्हा नियोजन समितीवर जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या लोकनियुक्त सदस्यांची निवड होणे गरजेचे असते. वर्षभरापूर्वी दोन वेळा त्यासंदर्भातील निवडणूक कार्यक्रमही जाहीर केला होता. पण आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा ती निवडणूक रद्द करण्यात आली. त्यामुळे अजूनही जिल्हा नियोजन समितीवर स्थानिक स्वराज्य संस्थांचे कोणीही प्रतिनिधी नाहीत. दरम्यान शासनाने वरील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याने काही जि.प.सदस्यांनी तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींना डावलून पक्षाच्या लोकांना या समितीवर घेणे म्हणजे हुकूमशाहीचा प्रकार असून याचा आपण निषेध करतो, अशी भावना जि.प.सदस्य अ‍ॅड.राम मेश्राम यांनी व्यक्त केली.

टॅग्स :BJPभाजपा