चामोर्शी शहरातील गणेशनगर, हनुमाननगर, आष्टीकडे जाणारा मार्ग वस्ती, ऑफिसर कॉलनी, मुल मार्गाच्या उजव्या बाजूची वस्ती साधुबाबानगर, आदी वस्त्यांमध्ये गेल्या दहा वर्षांपासून लोकसंख्या वाढली आहे. परंतु त्या वस्तीत मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या नाही. पक्के रस्ते व नाली व पिण्याच्या पाण्याची व्यवस्थेचा अभाव आहे. नाली अभावी सांडपाणी रस्त्यावरून वाहत असते त्यामुळे नागरिकांना चिखलातून अवागमन करावे लागते. तसेच शिक्षक मोरेश्वर गडकर यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत पाण्याचे डबके निर्माण झाले आहेत. त्या पाण्याच्या डबक्यात पाळीव प्राणी व जनावरे बसून त्या ठिकाणी उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे विसावा घेत आहेत. येथे डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होत असून रात्रीच्या सुमारास नागरिकांना डासांचा त्रास होतो. परिणामी अनेक वेळा सरपटणाऱ्या प्राण्यांचा सुद्धा येथे राहणाऱ्या नागरिकांना अनेक वेळा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने मूलभूत सोयी सुविधा द्यावा, अशी मागणी होत आहे.
चामोर्शीतील नवीन वस्ती बनली समस्याग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:36 IST