शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

गृहकराची नवी आकारणी भांडवली मूल्यांवर

By admin | Updated: January 15, 2016 02:11 IST

ग्रामपंचायत कर आकारणीतील बदल आणि न्यायालयाच्या स्थगितीमुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची मागील नऊ महिन्यांत एक रूपयाही करवसुली होऊ शकली नाही.

गडचिरोली : ग्रामपंचायत कर आकारणीतील बदल आणि न्यायालयाच्या स्थगितीमुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची मागील नऊ महिन्यांत एक रूपयाही करवसुली होऊ शकली नाही. राज्य शासनाने इमारतीच्या क्षेत्रफळावरील आकारणी रद्द करून नव्याने भांडवली मूल्यावर कर आकारणी निश्चित केली आहे. त्यामुळे आता गृहकराची आकारणी क्षेत्रफळाऐवजी भांडवली मूल्यावर होणार आहे. सामान्य नागरिकांना याचा चांगलाच फटका बसणार आहे. ग्रामपंचायत गृहकराबाबत टाकण्यात आलेल्या जनहित याचिकेवरून करावर न्यायालयाने स्थगिती दिली होती. ही स्थगिती नुकतीच उठविण्यात आली आहे. याबाबतचा ग्राम विकास विभागाचा आदेश संबंधित जिल्हा परिषदेत धडकला आहे. या निर्णयामुळे एप्रिल २०१५ पासून थांबलेल्या कर वसुलीला पुन्हा सुरुवात होणार आहे. शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे आता क्षेत्रफळाऐवजी भांडवली मूल्यावर कर आकारणी करण्यात येणार आहे. सुरुवातीच्या काळात शासनाने भांडवली मूल्यावर कर आकारणी करताना सध्याच्या काही पटीने वाढविण्यात येणार असल्याचा आराखडा प्रसिद्ध केला होता. त्यानंतरच्या सुधारित आराखड्यात कर आकारणी फक्त दुप्पट ते चारपट होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शासनाने २ जानेवारी २०१६ रोजी आदेश काढून नेमकी किती आकारणी होणार, हे त्यात स्पष्ट केले होते. भांडवली मूल्यावर आकारणी करताना इमारतीच्या घसारा या किमतीतून वजा करण्यात येणार आहे. त्या समितीची मार्गदर्शक तत्वेही त्यात सांगितली आहेत. इमारतीचे भांडवली मूल्य काढताना इमारतीचा क्षेत्रफळ, जमिनीचे वार्षिक मूल्यदर, इमारतीच्या प्रकारानुसार आकारणी, घसारा, इमारतीचा घरगुती, व्यावसायिक आणि वाणिज्य वापरासाठीचे निर्देशांक गृहीत धरण्यात येणार आहेत. यासाठी भूमिअभिलेख विभागातील रेडिरेकनरचा वापर करण्यात येणार असून यासाठी अधिकाऱ्यांपासून ग्रामसेवकांनाही चांगलीच कसरत करावी लागणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)