शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

शारीरिक आणि मानसिक विकासासाठी खेळांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 6:00 AM

सर्वप्रथम क्रीडाध्वज फडकावून, मशालीने क्रीडाज्योत पेटवून जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी क्र ीडाध्वजाला आणि मान्यवरांना मानवंदना दिली. यावेळी पंच व खेळाडूंना सामूहिक शपथ देऊन भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. तत्पूर्वी गावातून काढण्यात आलेल्या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

ठळक मुद्देजि.प.अध्यक्ष कंकडालवार : बालक्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे थाटात उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अहेरी : खेळांमुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास होऊन नवचैतन्य निर्माण होते. क्रीडा गुणांमुळे आत्मविश्वास आणि मनोबल वाढते. याशिवाय क्रीडा गुणांसह कलागुणांमुळे व्यक्तिमत्व विकास होत असल्यामुळे शालेय जीवनात खेळांची तितांत गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले. येथील क्रीडा संकुलाच्या प्रांगणात जिल्हास्तरीय शालेय बालक्रीडा स्पर्धा तसेच पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या क्र ीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी (दि.५) मोठ्या थाटामाटात झाले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.समारंभाच्या अध्यक्षस्थानी जि.प.चे उपाध्यक्ष मनोहर पोरेटी तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, जि.प.सदस्य अनिल केरामी, विद्या आभारे, कल्पना आत्राम, अनिता आत्राम, सुनिता कुसनाके, अजय नैताम, ऋषी पोरतेट, प्रभाकर तुलावी, कोदंडधारी नाकाडे, विनोद लेनगुरे, नीता साखरे, कविता भगत, रवींद्र शहा, जयसुधा जनगाम, श्रीदेवी पांडवला आदी जि.प.सदस्य आणि अहेरी पं.स.चे संवर्ग विकास अधिकारी प्रफुल्ल म्हैसकर, सभापती भास्कर तलांडे, उपसभापती गीता चालूरकर, सदस्य सुरेखा आलम, प्रशांत ढोंगे, छाया पोरतेट, शीतल दुर्गे, आलापल्लीच्या सरपंच सुगंधा मडावी, उपसरपंच पुष्पा अलोने, नागेपल्लीच्या सरपंच सरोज दुर्गे, मलरेड्डी येमनूरवार, व्येंकटरावपेठाचे सरपंच संपत सिडाम, सुरेश गड्डमवार आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना कंकडालवार म्हणाले, जि.प.च्या सर्व शाळांची आवश्यक ती दुरूस्ती आणि नवीन वर्गखोल्या देण्यात येईल. विद्यार्थ्यांना वर्षातून दोन वेळा गणवेश दिले जात आहे. याशिवाय जि.प.मार्फत शाळांना कोणत्याही गोष्टी कमी पडणार नाही याची दक्षता घेतली जाईल. दोन वर्षानंतर हे क्रीडा संमेलन घेताना राज्य सरकारकडून निधीची अपेक्षा न ठेवता आपल्यासह सर्व सदस्यांनी जिल्हा निधीतून हे संमेलन घेण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.सर्वप्रथम क्रीडाध्वज फडकावून, मशालीने क्रीडाज्योत पेटवून जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी क्र ीडाध्वजाला आणि मान्यवरांना मानवंदना दिली. यावेळी पंच व खेळाडूंना सामूहिक शपथ देऊन भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. तत्पूर्वी गावातून काढण्यात आलेल्या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.यावेळी प्रत्येक तालुक्यातील शाळांनी देशभक्तीपर नृत्य व देखावे सादर करून सांस्कृतिक कलेचे दर्शन घडविले. समारंभाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे यांनी तर संचालन गौतम मेश्राम व शैलेजा गोरेकर यांनी केले. आभार गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य यांनी मानले.कार्यक्रमासाठी अशोक दहागावकर, श्रावण दुर्गे, अजय सोनलवार, किशोर सूनतकर, तेजराव दुर्गे, लक्ष्मण गदेवार, विनायक वेलादी, लक्ष्मण दुर्गे, विनता कन्नाके, अवधुत धनंजय पाटील, उमा मडावी, रवी येमसलवार, उमेश चिलवेलवार, सिराज शेख आदी शिक्षकांनी सहकार्य केले. यावेळी सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सदस्य, पालक वर्ग व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.अहेरी तालुक्याला दुसऱ्यांदा मानजिल्हा परिषदेचा क्रीडा महोत्सव आयोजित करण्याचा बहुमान यावेळी दुसऱ्यांदा अहेरी तालुक्याला मिळाला. यापूर्वी जि.प.उपाध्यक्ष रवींद्रबाबा आत्राम असताना हे संमेलन अहेरी येथे झाले होते.८ फेब्रुवारीपर्यंत हे संमेलन चालणार असून यात वैयक्तिक आणि सांघिक खेळ होणार आहेत. उद्घाटन सोहळ्यासाठी मान्यवरांचे आदिवासी ढोल नृत्य व लेझिम नृत्याने तर शिक्षकांनी फुले उधळून स्वागत केले.

टॅग्स :zpजिल्हा परिषद